‘त्या’ नियुक्तीवर कारवाई करा

By Admin | Updated: August 24, 2015 02:08 IST2015-08-24T02:08:14+5:302015-08-24T02:08:14+5:30

म्हसाळा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक या तिघांनी मिळून पदाचा दुरुपयोग करीत नियमबाह्य शिपाई या पदावर नोकरभरती केली.

Take action on 'those' appointments | ‘त्या’ नियुक्तीवर कारवाई करा

‘त्या’ नियुक्तीवर कारवाई करा

वर्धा : म्हसाळा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक या तिघांनी मिळून पदाचा दुरुपयोग करीत नियमबाह्य शिपाई या पदावर नोकरभरती केली. त्यामुळे या तिघांवर महाराष्ट्र अधिनियम, १९५८ च्या कलम ३९(१)नुसार कारवाई करावी अशी मागणी येथील ग्राम पंचायत सदस्य नंदू सरोदे यांनी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सरपंच रीना गेडाम, उपसरपंच दीपक चव्हाण व ग्रामसेवक किरण वरघणे या तिघांच्या संगणमतानेच सदर नियुक्ती झाली असे ग्राम पंचायत सदस्यांनी मासिक सभेच्या ठरावाद्वारे स्पष्ट केल्याचे निवेदनात नमूद आहे. हर्षा कावडे ही महिला म्हसाळा ग्राम पंचायतमध्ये मनरेगा रोजगार सेवक पदावर मागील तीन वर्षापासून कार्यरत होती. या काळातच ग्राम पंचायत मध्ये अने मासिक सभा पार पडल्या. पण कोणत्याही मासिक सभेतील ठरावात हर्षा कावडे हिला मसाळा ग्राम पंचायत मध्ये शिपाई पदावर नियुक्तीचा ठराव झालेला नाही. पण सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी २७ एप्रिल २०१५ च्या मासिक सभेच्या नोटीस पत्रान्वये अजेंड्यावर क्रं. ९ च्या नियुक्ती पदावर विषय नसताना, शिवाय मासिक सभेत चर्चाही झाली नसताना या तिघांनी ९ क्रमांकावरच नियुक्ती बाबत ठराव नोंदविला.
शिपाई पदावर नियुक्ती झाल्याचे उर्वरित सदस्यांना १५ जुलैच्या सभेत कर्मचारी वेतन खर्चाद्वारे समजले. त्यामुळे सभेतील चर्चेत सदस्यांनी आक्षेप नोंदविला. त्यावेळी सरपंच रीना गेडाम यांनी मीच नेमणूक केली असे सांगितले.
त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करून गावातील गरजू महिलेलाच शिपाई पदआवर नेमण्यात यावे, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य नंदू सरोदे यांनी केली आहे. मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कआर्यपालन अधिकारी यांच्यासह आमदार डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे असून ही नियमबाह्य पदभरती केलेल्या तिघांवरही कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Take action on 'those' appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.