शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:45 IST

उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची शहरात सर्रास विक्री होत आहे. ही खरेदी-विक्री थांबवावी. नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीमार्फत करण्यात आली. यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची शहरात सर्रास विक्री होत आहे. ही खरेदी-विक्री थांबवावी. नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीमार्फत करण्यात आली. यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.मकर संक्रांतीच्या सणापासून शहरात लहान मुले व युवक हे पतंग उडवित असतात. पतंग उडविण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वास्तविक, उच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजापासून उद्भवणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेत यावर बंदी घातलेली आहे. असे असले तरी न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून शहरात खुल्या प्रमाणात नायलॉनच्या मांजाची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. पतंग उडविताना वापरात येणारा हा नायलॉनचा मांजा पतंग उडविणे झाल्यानंतर रस्त्यावर कुठेही फेकून दिला जातो. या मांजामुळे अनेकांचे हात, पाय, मान कापल्या गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शिवाय पतंग उडवित असताना आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनाही यामुळे इजा होते. यामुळे पर्यावरण बचाव समितीने मांजाची विक्री करणाऱ्यांवर तथा त्याची खरेदी करणाऱ्या युवकांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून इतर युवक, नागरिक नायलॉन मांजापासून दूर होतील.याबाबत पर्यावरण बचाव समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच पायबंद घालावा, अशी मागणीही समितीने केली. यावेळी अध्यक्ष शुभम जगताप, उपाध्यक्ष अंकुश जाऊरकर, कोषाध्यक्ष सुरज विरपाचे, योगीराज बोराडे, आकाश ठाकरे, आकाश केने, मयूर शिरभाते, गोलू दारोकर, कुणाल शेवतकर, सार्थक तिवस्कर, गौरव गिते, भाविक दारोकार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.