दलित अत्याचार, कोपर्डी बलात्कार, आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कार्यवाही करा

By Admin | Updated: August 19, 2016 02:15 IST2016-08-19T02:15:45+5:302016-08-19T02:15:45+5:30

दलितांवरील अत्याचार वाढत आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश येथील घटना तसेच कोपर्डी बलात्कार, डॉ. आंबेडकर भवन...

Take action on Dalit atrocities, Kopardi rape, Ambedkar Bhadan casters | दलित अत्याचार, कोपर्डी बलात्कार, आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कार्यवाही करा

दलित अत्याचार, कोपर्डी बलात्कार, आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कार्यवाही करा

माकपा, जनता, आरपीआय ची मागणी
वर्धा : दलितांवरील अत्याचार वाढत आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश येथील घटना तसेच कोपर्डी बलात्कार, डॉ. आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रेस पाडणाऱ्यांवर कार्यवाही करा, अशी मागणी संघटनांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दलितांना त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी दलित अत्याचाराचा निषेध केला; पण ही कृती निरर्थक आहे. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रेस पाडणे. या प्रकरणी कार्यवाही करावी, अशी मागणी माकपचे यशवंत झाडे, संजय भगत, चंद्रभान नाखले, महेश दुबे, गणेश भुतडा, जनता दलाचे शिवाजी ईथापे तसेच मनोहर पंचारिया, रोहन बन्सोड, आदींनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Take action on Dalit atrocities, Kopardi rape, Ambedkar Bhadan casters