मूठभर तांदूळच स्वप्निलचा आहार

By Admin | Updated: June 6, 2014 00:09 IST2014-06-06T00:09:28+5:302014-06-06T00:09:28+5:30

लहान मुलं म्हटले की त्यांच्या बालसुलभ सवयींची सगळ्यांनाच हौस असते. चॉकलेट, ट्रॉफी, बिस्कीटे, नुडल्स, आईस्क्रीम ही बालपणाच्या हट्टाची जेवणाची व खाण्याची मौज म्हणून बालकात दिसून येते.

Swapnil diet of a handful of rice | मूठभर तांदूळच स्वप्निलचा आहार

मूठभर तांदूळच स्वप्निलचा आहार

वय वर्षे १५ : बालपणापासूनच जेवण नाही
आर्वी : लहान मुलं म्हटले की त्यांच्या बालसुलभ सवयींची सगळ्यांनाच हौस असते. चॉकलेट, ट्रॉफी, बिस्कीटे, नुडल्स, आईस्क्रीम ही बालपणाच्या हट्टाची जेवणाची व खाण्याची मौज म्हणून बालकात दिसून येते. परंतु या सर्व बालसुलभ सवयींना अपवाद ठरला आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील बालक स्वप्नील जगदीश मोहेकर.
वय वर्षे १५. उंची ३ फूट. बालपणीच आईचे छत्र हरपले. वडील व आजोबांनीच त्याला आई आणि वडिलाची माया देऊन लहानाचे मोठे केले. बालसुलभ वयासोबतच वाढत्या वयाबरोबर त्याला जेवणाची सवय लावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु स्वप्नील जेवणाच्या ताटाकडे ढुकूंनही पाहत नाही. जेव्हापासून त्याला समज आली त्या वयापासून घरातील डब्यात असलेल्या तांदळाचे मुठभर दाणे घेवून एक-एक दाना तोंडात टाकून तेच दिवसभर पुरवितो. तेच त्याचे जेवण.
स्वप्निलचे वडील जगदीश गुराख्याचे काम करतात. तर त्याचे आजोबा सोमाजी हे वर्धमनेरी आश्रमातील गोशाळेतील गुरांची देखभाल करतात. स्वप्नील आजोबासोबत दिवसभर भानुदास महाराज यांच्या आश्रमात राहतो. स्वप्निलचा जेवण न घेता तांदळाच्या दान्यावर आपला उदर निर्वाह करतो. ही बाब पंचक्रोशीत   कुतुहलाचा विषय बनली आहे.
अन्नाशिवाय माणूस जीवंतच राहत नाही असे म्हणतात पण स्वप्निल याला अपवाद ठरला आहे.  विज्ञान व डॉक्टर पेशातील मंडळीसाठी स्वप्निलचे तांदूळ खाऊन जगणे निश्‍चितच विचार करायला भाग पाडणारे आहे. तो पंधरा वर्षांचा झाला तेही तांदळाच्या आहारातूनच.   स्वप्निल सामान्य मुलांप्रमाणेच वाढतो आहे.
आता त्याच्या शरीराला तांदळाची सवड जडली आहे.  या त्याच्या तांदूळ खाण्याच्या अफलातून जगण्याने गावकर्‍यांनी त्याचे ‘साधू’ असे नामकरण केले आहे. गावात व मंदिर परिसरात अनेक विवाह साहेळे होतात. त्याला गावकरी मोठय़ा आवडीने जेवायला बोलवितात, पण तो अन्नाचा एक घास ही खात नाही. गरीब असो वा श्रीमंत आता त्याला कुणीही जेवणाचा आग्रह करीत नाही. तो घरून निघतो तो खिशात         मुठभर तांदूळ भरूनच. दिवसभर एक-एक दाणा चिमणीसारखा दिवसभर खात राहतो. तो शाळा शिकत      नाही. दिवसभर आजोबासोबत आश्रमातच राहतो. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Swapnil diet of a handful of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.