स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा
By Admin | Updated: December 14, 2015 01:57 IST2015-12-14T01:57:33+5:302015-12-14T01:57:33+5:30
सेवाग्राम आश्रम ते जंतर-मंतर दिल्लीपर्यंत स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा काढण्यात आली.

स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा
वर्धा : सेवाग्राम आश्रम ते जंतर-मंतर दिल्लीपर्यंत स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा सेवाग्राम आश्रम येथून प्रारंभ करण्यात आला. यात उदयसिंग राजपूत, अभिमन्यू भारतीय, राजेंद्र घुमनर दया मोरे, गौरक्ष चितळे, सुनिल पाटोडे, प्रकाश घुमनर यांचा सहभाग आहे.
या यात्रेतून एकाधिकारशाही सत्ता केंद्रीकरण तसेच ग्रामीण भागाचा रखडलेला विकास यामुळे उपस्थित झालेल्या समस्या याबाबत जागृती करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा स्वीकार हा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या स्थितीत या विचाराची गरज प्रकर्षाने जाणवते. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात नागरी समस्यांना ऊत आला आहे. स्वदेशीचा स्वीकार करण्याची गरज या यात्रेतून नागरिकांना सांगण्यात येणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)