पांजरा गोंडी जंगलात संशयास्पद मृतदेह
By Admin | Updated: August 14, 2015 02:18 IST2015-08-14T02:18:10+5:302015-08-14T02:18:10+5:30
खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्य पांजरा (गोंडी) शिवारात गुरूवारी पुरुषाचा मृतदेह आढळला.

पांजरा गोंडी जंगलात संशयास्पद मृतदेह
आकोली : खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्य पांजरा (गोंडी) शिवारात गुरूवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो चार पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करणे गरजेचे असताना तसे झाले नाही. याचा त्रास पोलिसांना तपासात होणार असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस सुत्रानुसार, पांजरा (गोंडी) शिवारात एक मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. यावरून घटनास्थळी जात पाहणी केली असता तो एका पुरूषाचा असल्याचे निदर्शनास आले. मृतकाचे वय अंदाजे ५० वर्षे असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना ४-५ दिवसांपूर्वीची असावी असा संशय आहे. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्रामच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते; मात्र दोनही रुग्णालयाचे अधिकारी आले नसल्याने अखेर पोलिसांनी तो मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात नेला. ठाणेदार प्रशांत पांडे मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय ते शवविच्छेदनानंतर काय ते सत्य समोर येईल.(वार्ताहर)