शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

बदलीकरिता मृत मुलगा जिवंत दाखविणारी शिक्षिका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:08 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देबोगस प्रमाणपत्र बदली प्रकरण इतर शिक्षकांचा अहवाल वरिष्ठांकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. तर इतर शिक्षकांचा अहवाल तयार करून तो मार्गदर्शनाकरिता वरिष्ठांकडे मार्गदर्शनाकरिता पाठविला असल्याची माहिती आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत वर्धेत अनेक आश्चर्यजनक प्रकार घडले. यात एका शिक्षिकेने पती गडचिरोलीत असताना त्याचे वर्धेत एकत्रिकरण दाखविले तर दुसऱ्या एका शिक्षिकेने विवाहित असताना कुमारीका असल्याचे दाखविले. या दोघींपेक्षा एका शिक्षिकेने तर हद्दच केल्याचे समोर आले आहे. या शिक्षिकेने दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेला मतीमंद मुलगा जिवंत असल्याचे दाखविले. हे तिनही प्रकरण ‘लोकमत’ने उघड करताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली. ‘लोकमत’ चे वृत्त प्रकाशित होताच गृहविभागाने त्याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले.या आदेशावरून चौकशी करण्यात आली असता यात अनेक प्रकार समोर आले आहे. जवळची शाळा मिळविण्याकरिता अनेक शिक्षकांनी अंतरात घोळ केल्याचे समोर आले आहे. यात एका शिक्षकाने २२ किलोमिटरचे अंतर ५२ किलो मिटर दाखविल्याचे समोर आले आहे. असे अनेक प्रकार चौकशी दरम्यान उघड झाले. असे अजब प्रकार करणाऱ्या तालुक्यातील १८ प्रकरणे आहेत.तर संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे ५२ प्रकरणे आहेत. या प्रकरणावर चौकशी पूर्ण झाली असून कार्यवाही करण्यासंदर्भात वरिष्ठांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

अंतराबाबत रापमचे प्रमाणपत्र ग्राह्य धरू नयेजिल्हातर्गत बदलीत अनेक शिक्षकांनी रापममधून अंतराचे प्रमाणपत्र आणले आहे. यात अनेक अंतर नियमात बसविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे हा प्रकार शासनाची दिशाभूल करणारा आहे. म्हणूनच रपमचे अंमर ग्राह्य धरू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने केली आहे.मृत मुलगा जिवंत दाखविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या कल्पना गौतम (गवालपंची) नामक शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. बदलीत गैरप०कार करणाऱ्या शिक्षकांवरील ही पहिली कारवाई आहे. यानंतर अनेक शिक्षकांवर अशी कारवाई होण्याचे संकेत आहेत.- सुभाष खिराळे, गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) वर्धा

टॅग्स :Teacherशिक्षकCrimeगुन्हा