शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या यादव यांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:57 PM

मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजची मागणी : जुन्या वैमनस्यातून दुसऱ्यांच्या भांडणात गोवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच शहर पोलीस ठाणे गाठत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या रामनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यादव यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली.बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात काही युवकांचे भांडण झाले. ते सोडविण्यास गेलेल्या युवा: परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्यावर सहायक पोलीस निरीक्षक यादव यांनी खोटे गुन्हे दाखल केले. इतकेच नव्हे तर रात्रीच त्यांना अटकही केली. युवा: परिवर्तन की आवाज ही एक सामाजिक संघटना आहे. अध्यक्ष निहाल पांडे उच्चशिक्षित असून कायद्याच्या चाकोरीत राहून ते सामाजिक कार्य करतात. या संघटनेतील कार्यकर्ते सुशिक्षित व शिक्षण घेणारे आहे. कुठेही गुन्हेगारी क्षेत्रात त्यांची नावे नाहीत. असे असताना बुधवारी रात्री आमंत्रण हॉटेलजवळ घडलेल्या प्रकारात निहाल पांडे यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीवर दबाव टाकून तक्रारी नाव नमूद करून घेत जुन्या वैमनस्यातून यादव यांनी खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकारामुळे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा ज्या महिलांसाठी आंदोलने केली, त्या महिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. फिर्यादीनेही वकिलामार्फत अ‍ॅफीडेव्हीट करून देत दबावामुळे निहालचे नाव दिल्याची कबुली दिली. या प्रकारामुळे खोटे गुन्हे दाखल केल्याचे सिद्ध होते. यामुळे यादव यांना निलंबित करा, अशी मागणी महिला व कार्यकर्त्यांनी केली. यावर पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महिलांचा जेवणास नकारबुधवारी रात्री अटक केल्यानंतर निहाल पांडे यांना जेवणही यादव याने नाकारले. शिवाय सकाळीदेखील कुणाला भेटू दिले नाही. यामुळे शहर पोलीस ठाण्यात जमलेल्या महिलांनीही जेवणास नकार दिला. जामीण मिळाल्यानंतर निहाल यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे