घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:58:49+5:302014-09-02T23:58:49+5:30
गणेश नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भंडारा येथील एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल

घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत
वर्धा : गणेश नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भंडारा येथील एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) रा. संत कबीर वार्ड, भंडारा असे असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
१८ आॅगस्ट २०१४ रोजी गणेशनगर येथील शेख सादीक शेख सत्तार (२८) हे कुटुंबीयांसह बाहेर भागी गेले होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा एकूण ९१ हजार ८०० रुपयाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.
शहर पोलिसांसह या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. चोरीच्या प्रकारावरून व पोलिसांकडे असलेल्या माहितीवरून जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) रा. संत कबीर वार्ड, भंडारा याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता जितेंद्र तोमर हा १८ आॅगस्ट २०१४ रोजी वर्धा न्यायालयात तारखेवर आला होता. दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान त्याने गणेश नगर वर्धा येथील भागात चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याजवळून चोरीस गेलेली सोन्याची अंगठी घड्याळ व रोख नगदी १ हजार २०० रुपये व इतर साहित्य असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा ५०० रुपयांचा माल जप्त केला.
जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) हा भंडारा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी संबंधाने अनेक गुन्हे नोंद आहेत. सदर आरोपीने वर्धा शहरात आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सयहायक फोजदार उदयसिंग बारवाल, हवालदार अशोक वाट, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, समीर कडवे, कुलदीप टांकसाळे, मनिष साळवे यांनी केली.(प्रतिनिधी)