शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

सूरजने सर केले ‘नागणी देवी’ शिखर

By admin | Updated: December 18, 2014 02:08 IST

स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत असलेल्या देवळी येथील एसएनएनजे़ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा सार्जेंट सूरज किसना पोटफोडे याने...

वर्धा : स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत असलेल्या देवळी येथील एसएनएनजे़ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा सार्जेंट सूरज किसना पोटफोडे याने आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर उत्तरकाशी परिसरात असलेल्या हिमालय पर्वत रांगेतील १०,५०० फुट उंच ‘नागणी देवी’ शिखर सर करून नवा इतिहास रचलासूरज पोटफोडे यांची निवड महाराष्ट्र एनसीसी निदेशालयाच्या वतीने नेहरू माऊंटनिअरिंग इंन्स्टिट्युट उत्तरकाशी येथे आयोजित १५ दिवसीय माऊंटनिअरिग शिबिराकरिता झाली होती़ त्याने सदर हिमालय पर्वतारोहन अभियानात सहभागी होवून ‘टेकला’ ‘चौरंगी खाल’ ‘यम द्वार’ व ‘संकुरणी धार’ शिखर पार करून अत्यंत खडतर मार्गाने चढाई करीत आठ नोव्हेंबर रोजी दुपारी २़४५ वा़ परिसरातील १०, ५०० फुट उंच असे सर्वोच्च ‘नागणी देवी शिखर’ सर केले़ या अभियानात भारतातून निवडक ९ एनसीसी कॅडेट्चा सहभाग होता़ शिबिराचा बेस कॅम्प ४५०० फुट उंचीवर स्थित होता़शिबिरात रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग, रिव्हर क्रॉसिंग, चिमणी रॉक क्लाईबिंग, आपदा व बचाव पद्धतीचे प्रशिक्षण पर्वतारोहिंना देण्यात आले़पदभ्रमंतीत मार्गावरील चॉकलेट्सचे रॅपर्स, पॉलिथीनच्या पिशव्या जमा करून त्याची विल्हेवाट लावून ‘किप हिमालया क्लिन अ‍ॅड ग्रिन’ चा संदेश दिला़ पदभ्रमंतीशिवाय पक्षी निरीक्षण, चित्रकला, पर्वत शृंखला, स्थानिक वृक्ष व निसर्ग अभ्यास तसेच प्रसिद्ध नागदेवी मंदिर, नचिकेता ताल व खंडोबा या स्थळांना भेटी देण्यात आल्या़ सूरजने १५ दिवसीय पर्वतारोहन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून नागणी देवी शिखर सर केल्याबद्दल त्याचे नेहरू माऊंटनिअरींग इंन्स्टिट्युटच्या वतीने कौतुक करण्यात आले.(प्रतिनिधी)