सुरेल पाडवा पहाट...
By Admin | Updated: March 29, 2017 00:46 IST2017-03-29T00:46:24+5:302017-03-29T00:46:24+5:30
गुढी पाडव्यानिमित्त वर्धा शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने मंगळवारी पहाटे

सुरेल पाडवा पहाट...
सुरेल पाडवा पहाट... गुढी पाडव्यानिमित्त वर्धा शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने मंगळवारी पहाटे मुख्य मार्गावर सोशालिस्ट चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाडवा पहाटचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहरवासीयांची मोठी गर्दी होती. कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, सावंगंी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, ब्रह्मकुमारीजच्या माधुरीदीदी, हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू मिश्र तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. गत चार वर्षांपासून असाच कार्यक्रम पुलगाव येथेही पार पडत आहे. यंदाही तेथे संगीतमय कार्यक्रम झाला. तर यंदाच्या वर्षापासून आष्टी (शहीद) येथेही पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.