सर्वात्मका सर्वेश्वरा, माझे म्हणा...करूणा करा

By Admin | Updated: October 31, 2015 03:02 IST2015-10-31T03:02:42+5:302015-10-31T03:02:42+5:30

सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये... हे जगत्राता विश्वविधाता... यासह अनेक भक्तीगीतांनी इश्वराला स्वराभिषेक करण्यात आला.

The Supreme Lord, say to me ... have mercy | सर्वात्मका सर्वेश्वरा, माझे म्हणा...करूणा करा

सर्वात्मका सर्वेश्वरा, माझे म्हणा...करूणा करा

सावंगीच्या साई मंदिर वार्षिकोत्सव : स्वराभिषेकाने श्रोते मंत्रमुग्ध
वर्धा : सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये... हे जगत्राता विश्वविधाता... यासह अनेक भक्तीगीतांनी इश्वराला स्वराभिषेक करण्यात आला. निमित्त होते, राधिकाबाई मेघे स्मृती न्यास संचालित सावंगी (मेघे) रुग्णालय परिसरातील साई मंदिराच्या वार्षिकोत्सवात आयोजित ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भक्ती व भावगीतांच्या मैफलीचे. यातील सुरेल भाव व भक्तीगीतांनी श्रोत्यांना मुंत्रमुग्ध केले.
स्वराभिषेक संगीत संचाद्वारे आयोजित कार्यक्रमाची सुरूवात ‘गगन सदन तेजोमय’ या प्रार्थनागीताने झाली. त्या पाठोपाठ नितीन वाघ यांनी ‘गुरू परतात्मा परेशू’ तर ईशा पारेकर यांनी ‘जय शारदे वागेश्वरी’ हे स्तवनगीत सादर केले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात नितीन वाघ यांनी सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये, हे जगत्राता विश्वविधाता या भक्तीगीतांसोबतच हे सुरांनो चंद्र व्हा, हे नाट्यगीतही आपल्या दमदार शैलीत प्रस्तुत केले. ईशा पारेकर यांनी प्रभू मी तुझ्या करातील वीणा, राधा कृष्णावरी भाळली, अपार हा भवसागर, अबीर गुलाल उधळीत रंग, मिला दे सखी आदी भक्तीरचना गायल्या. सायली इंगळे हिने संत तुकारामांचा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अभंग, ‘नदीच्या पल्याड’ हा जोगवा तसेच शरदाचे चांदणे या नवनवल नयनोत्सवा, शारदा सुंदर चंदेरी राती, आदी भावगीते व नाट्यगीते सादर केली. डॉ. अनुष्का पारेकर हिने तुम आशा विश्वास हमारे, शंभो शंकरा या भक्तीगीतांसह ‘मथुरेच्या बाजारी’ ही गवळण नितीन वाघ यांच्या सोबत सादर केली. संगीता इंगळे यांनी देव माझा विठू सावळा, केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर आदी रचना गायल्या. कार्यक्रमाची सांगता ‘सोपविले दैव सारे साईनाथा हाती’ या वाघ यांच्या भैरवीने झाली. निवेदन डॉ. उत्तम पारेकर यांनी केले. गायकांना नितीन वाघ, श्याम सरोदे, अनिल पिल्लेवार यांनी संगीतसाथ केली. आभार मधुकर इंगळे यांनी मानले. मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The Supreme Lord, say to me ... have mercy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.