वर्धा : सेलू येथील कापूस व्यापाऱ्याने फसविलेल्या रकमेकरिता किसान अधिकारचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व अखिल भारतीय किसान खेतीहर मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे, सुदाम पवार यांच्यास सात शेतकरी नागपूरला प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहे. ज्याची दखल अजूनही शासनाने घेतलेली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सेवाग्राम आश्रम येथील नई तालीम समितीसह विविध संघटनांच्यावतीने शनिवारी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक परिसरातून गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता विकास चौक सेलू येथे सर्व शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन आयोजित आहे. यात सर्व परिवर्तनवादी, सामाजिक जाण असलेल्या आणि शेतकऱ्यांबाबत कळवळा असलेल्या सामन्यातील सामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या आंदोलनात नई तालीम समिती, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकार्पण सेवा, किसान अधिकार मंच, मगन संग्रहालय समिती या आंदोलनात सहभागी होत आहे.(प्रतिनिधी)
नागपूर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्धेत पदयात्रा तर सेलूत धरणे
By admin | Updated: March 5, 2016 02:17 IST