उपमुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा
By Admin | Updated: July 27, 2014 23:52 IST2014-07-27T23:52:50+5:302014-07-27T23:52:50+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना मदत वाटपासंदर्भात आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टी व पुरामुळे

उपमुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा
शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या : राष्ट्रीयकृत बँकांना निर्देश
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना मदत वाटपासंदर्भात आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्यात.
जिल्ह्यात सरासरी ८६.०२ टक्के पाऊस पडला असून, वर्धा, कारंजा व आर्वी तालुक्यात १०० टक्क्यापेक्षा अधिक पावसामुळे पुरपरिस्थीतीसह शेतीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेताना ना. पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे मनुष्य व वित्तहानी संदर्भात तत्काळ पंचनामे करून सानुग्रह अनुदानाचे वाटप पूर्ण करा. घरांच्या नुकसानी संदर्भात केवळ अतिवृष्टी कालावध न धरता त्यानंतरही घरांची पडझड झाली असेल तर त्याबाबतही पंचनामे करून अनुदानाच्या वाटपापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात केलेली पेरणी, त्यानंतर पावसाचा खंड यामुळे दुबार पेरणीचे संकट तसेच अतिवृष्टी संदर्भात पिकांचे झालेले नुकसान याबाबत सविस्तर आढावा घेवून नुकसानी संदर्भात पंचनामे करा. अशा सुचना करतांना शेतपिकांचे डुक्कर व रोह्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. अनिल देशमुख, ना. रणजीत कांबळे, ना. सचिन अहिर, विदर्भ सिंचन पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुरेश देशमुख, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)