नांदुराचा नेत्रहीन भगवान ठरला सूरसंगम स्मार्ट सिंगर
By Admin | Updated: August 9, 2016 01:24 IST2016-08-09T01:24:16+5:302016-08-09T01:24:16+5:30
साहित्य कला शोधक मंचाच्यावतीने स्व. मोहम्मद रफी स्मृती प्रित्यर्थ ३० वी विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन

नांदुराचा नेत्रहीन भगवान ठरला सूरसंगम स्मार्ट सिंगर
वर्धा : साहित्य कला शोधक मंचाच्यावतीने स्व. मोहम्मद रफी स्मृती प्रित्यर्थ ३० वी विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन सूरसंगम स्मार्ट सिंगर स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेचा विजेता नांदूरा येथील भगवान बाभुळकर ठरला. विशेष म्हणजे तो नेत्रहीन आहे. स्पर्धेचा द्वितीय पुरस्कार चंद्रपूर येथील मुकेश मेहरा तर तृतीय पुरस्कार मकसुद खान याने पटकाविला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून विधीतज्ज्ञ अॅड. वैभव वैद्य, इमरान राही, डी.के. पाटील, लॉयन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी, मंचचे अध्यक्ष सुनील बुरांडे, सचिव प्रभाकर उगेमुगे, मैत्री सामाजिक संस्थेचे सचिव पंकज घुसे मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून सुनील बुरांडे यांनी ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर वर्धेकरांच्या सहकार्याने करण्याचा मानस व्यक्त केला. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव, बंधुभाव अधिक बळकट व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वर्धेतील अॅड. असफ खान पटेल, अॅड. उदापूरकर, डॉ. अजय वाणे, दीपक अग्रवाल, कवी संजय इंगळे तिगावकर, कमलकिशोर शर्मा, अहेसान राही, विनोदकुमार सराफ, आदी अनेक मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्पर्धेचे कार्यवाहक दीपक मेने यांनी केले तर आभार विनीत पाराशर यांनी मानले.
स्पर्धेत तीन पारितोषिकांसह प्रोत्साहन पुरस्कार मयूर पटाईत (वर्धा), विनोद सोनवणे (वर्धा) सतीश वानखडे (मदनी), बाळू हरणे (हिंगणघाट), हर्सना साबरी (नागपूर), सावेरी सोनी (वर्धा), स्मीत वंजारी (चंद्रपूर), प्रकाश गवारकर (वर्धा), प्रवीण पेटकर, (सिरूड) यांना देण्यात आला.
स्पर्धेच्या प्रथम फेरीचे परीक्षण सुरेश सालबर्डे, नरेंद्र माहुलकर, जयंत भिरंगे यांनी पार पाडले. अंतीम फेरीचे परीक्षण सुरमणी वसंत जळीत, वीणा उदापूरकर वर्धा, विजय दुरूतकर, यवतमाळ यांनी केले.
प्रभाकर उगेमुगे, विनित पाराशर, प्रमोद गुंडतवार, प्रशांत चवडे, दीपक मेने, हरिष कनोजे, डॉ. विजय लोखंडे, सुनील काळे, चंद्रजीत टागोर, सुनील इंगोले, नितीन पटवर्धन, श्रीकांत वाघ, प्रशांत हटवार, आनंद मुन, विलास कुलकर्णी, नरेंद्र नरोटे, प्रा. शिरीष सुतार, वासुदेव गोंधळे, प्रफुल केने, प्रा. सुनील अंभोरे, प्रा. विक्रांत रोटकर, अमर काळे, किशोर ढवळे, अॅड. अरूणा खरे, डॉ. संजीवनी लोखंडे, सूर्यकांत शेगावकर, श्याम दुर्गे, काशीनाथ गावंडे ही मंचाची मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.(प्रतिनिधी)