शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुमित वानखेडे यांना भाजपची उमेदवारी, केचे यांचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:12 IST

आर्वीचा उमेदवार घोषित : महायुतीचा गुंता सुटला, लढत रंगतदार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महायुतीतील भाजपने जिल्ह्यातील चारपैकी तीन उमेदवार घोषित केले होते. मात्र, आर्वीचा तिढा कायम होता. सोमवारी पक्षाने तिसऱ्या यादीत आर्वी विधानसभेतून सुमित वानखेडे यांना उमेदवारी घोषित करून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यावरच डाव उलटवला आहे.

महायुतीत जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी हे चारही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहे. मात्र, भाजपने पहिल्या यादीत केवळ वर्धा, देवळी आणि हिंगणघाटसाठी उमेदवार घोषित केले होते. आर्वीचा तिढा कायम होता. तेथे विद्यमान आमदारांनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याची हूल त्यांनी उठवली होती. समाज माध्यमांवर चला अर्ज भरायला, अशी सादही घातली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी अर्जही दाखल केला. मात्र, त्यांनी अर्ज सादर करताच इकडे भाजपने त्यांच्यावरच डाव उलटवून सुमित वानखेडे यांची उमेदवारी घोषित केली. दरम्यान, मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. 

आता आर्वीतून पक्षशिस्त पाळत विद्यमान आमदार उमेदवारी मागे घेतात की रिंगणात कायम राहतात, हे ४ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील चारही उमेदवार आता घोषित झाले आहेत. त्यामुळे यावेळी चारही मतदारसंघात रंगतदार लढत होण्याचे संकेत मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. 

आघाडीत बिघाडीचा बिगुल, समीर देशमुख मैदानात महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समीर देशमुख यांनी सोमवारी वर्धा विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथून इच्छुक असताना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर काँग्रेसला उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी पत्रपरिषदेतून केला. येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतही पक्षाने दुर्लक्ष करून काँग्रेसमधून आयात केलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला. दरम्यान, हिंगणघाट मतदारसंघातही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन नेते मंगळवारी नामांकन दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचा बिगुल वाजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धा