शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

आत्महत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:03 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : रा.स्व.संघाने आर्थिक आरक्षणाची व्याख्या मांडावी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे. आर्थिक आरक्षणाबाबत रा.स्व.संघाचे पुढारी बोलत असले तरी त्यांनी सर्वप्रथम त्याची व्याख्या मांडावी, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत असले तरी विदर्भात अमरावतीनंतर मराठा समाज कुठेही मोठ्या प्रमाणात नाहीत. विदर्भात कुणबी समाज बांधव आहेत. त्यांना हा लढा आपला वाटत नसल्याने ते यात सहभागी झालेले नाही असा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे. आरक्षणाची मागणी रेटताना मराठा समाज बांधव आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत. ही बाब गंभीर आहे. जगणे हे महत्त्वाचे मानल्या जात असून आत्महत्यांनी हा प्रश्न सुटणार नाहीच. शिवाय या आंदोलनकर्त्यांना त्यांचे पुढारीही आत्महत्या थांबवा असे सांगण्याच्या स्थितीत नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.सध्या संविधान पुढे चालेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१९ ची निवडणूक संविधान कायम ठेवणारे व ते बदलविण्याचा प्रयत्न करणारे अशीच रंगणार आहे. या निवडणुकीत आम्ही आमचा वापर होऊ देणार नाही. ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समुहातील सामाजिक व राजकीय प्रतिनिधींसोबतच्या संवाद बैठकांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहे. या सरकारची खरी टेस्टींग २०१९ च्या निवडणुकीत होणार आहे.महानगर पालिकांची निवडणूक पैशांच्या जोरावरच होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. पत्रकार परिषदेला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजय मोरे, राजू गोरडे आदींची उपस्थिती होती.वंचितांशी साधला संवादभारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर वंचितांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत रविवारी वर्धा येथे प्रदीप मंगल कार्यालयात त्यांनी वंचितांशी संवाद साधला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावरही त्यांनी पत्रकार परिषदेत टिका केली. तसेच या कार्यक्रमाला धनगर समाजाचे नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्र्श्वभुमीवर भारीप बहुजन महासंघाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण