वर्धा जिल्ह्यात दोन चिमुकल्या मुलींसह गरोदर महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:00 IST2020-04-26T18:00:21+5:302020-04-26T18:00:57+5:30
अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या खानगाव येथे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास एका गर्भवती महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

वर्धा जिल्ह्यात दोन चिमुकल्या मुलींसह गरोदर महिलेची आत्महत्या
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या खानगाव येथे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास एका गर्भवती महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. खानगाव येथील रहिवासी असलेले महेश ठाकरे यांच्या शेतात मेंढपाळांचा मुक्काम होता. या मेंढपाळांच्या कळपात असलेली ही महिला असून तिचे नाव निर्मला सुमीत कुरवटकर (२४) असे आहे. तिने आपल्या दोन मुली राधिका (४) व काजल (३) या दोघींसह रविवारी सकाळी विहिरीत उडी घेतली. या आत्मघातकी निर्णयामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस तपास सुरू आहे.