देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: May 13, 2014 00:02 IST2014-05-13T00:02:31+5:302014-05-13T00:02:31+5:30
तालुक्यातील नारा येथे सखुमाय मंदिरात देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाने गावातील अण्णासाहेब गुंडेवार विद्यालयाच्या परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाची आत्महत्या
कारंजा (घा.) : तालुक्यातील नारा येथे सखुमाय मंदिरात देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाने गावातील अण्णासाहेब गुंडेवार विद्यालयाच्या परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर युवकाचा मृतदेह वर आला नसल्याने पोलीस मृतदेह विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. मृतकाचे नाव गोपाल रमेश बावणे रा. वाढोणा जि. नागपूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल रमेश बावणे हा त्याच्या सहकार्यांसह नारा येथे सखुमाता मंदिरात दर्शनाकरिता आला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास तो परत जात असताना त्याने सहकरी वामन लोखंडे व गणेश मारबते, रा.कचेरा सावंगा, त.काटोल, जि.नागपूर यांना वाटेत लघुशंकेला जातो म्हणून सांगितले. याच वेळी त्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत उडी घेतली. गोपाल हा वामन लोखंडे यांच्याकडे दोन महिन्यांपासून बॅण्ड पार्टीच्या व्यवसायाकरिता कामाला होता. याची तक्रार वामन लोखंडे यांनी दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.(शहर प्रतिनिधी)