चेतनचे अकस्मात जाणे अनेकांना चटका लावून गेले
By Admin | Updated: March 2, 2017 00:39 IST2017-03-02T00:39:48+5:302017-03-02T00:39:48+5:30
नियतीच्यापुढे सर्वांचेच हात टेकतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती चेतनच्या अकस्मात मृत्यूने नाचणगावकरांना आली.

चेतनचे अकस्मात जाणे अनेकांना चटका लावून गेले
नाचणगाव : नियतीच्यापुढे सर्वांचेच हात टेकतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती चेतनच्या अकस्मात मृत्यूने नाचणगावकरांना आली. २२ वर्षीय चेतन प्रभाकर देवगडे याचा दीर्घ आजाराने झालेला मृत्यू अनेकांना चटका लावून गेला.
चेतनने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. अन्य युवकांप्रमाणे त्याने आयुष्यात स्वप्ने पाहिली होती. परंतु अशातच त्याला दुर्धर आजार जडला. यात त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू झाले. किडनीदात्याचा शोध सुरू झाला. घरची परिस्थिती सामान्यच आहे. त्याच्या काकू सुनिता देवगडे यांनी किडनीदात्त्या म्हणून पुढाकार घेतला. वैद्यकीय तपासणीनंतर किडनी प्रत्यारोपणासाठी १५ मार्च हा दिवस निश्चित केला. मात्र त्यापूर्वीच त्याची प्रकृती ढासळली व सोमवारी प्राणज्योत मालवली.(वार्ताहर)