कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा
By Admin | Updated: September 10, 2016 00:39 IST2016-09-10T00:39:26+5:302016-09-10T00:39:26+5:30
येथे वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन असून त्या बसस्टेशनचा सध्यातरी कोणी वाली नसल्याने येथील कारभार रामभरोसे काम सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा
पाणी असून विजेअभावी पिकांचे नुकसान : अधिकारी नसल्यामुळे रामभरोसे कारभार
विजयगोपाल : येथे वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन असून त्या बसस्टेशनचा सध्यातरी कोणी वाली नसल्याने येथील कारभार रामभरोसे काम सुरू आहे.
विजयगोपाल येथून अभियंता फाळे यांची यवतमाळ येथे बदली झाली. आॅगस्टमध्ये ते आपला प्रभार सोपवून यवतमाळला रूजू झाले. तेव्हापासून या सबस्टेशनला हक्काचा अधिकारी मिळालेला नाही. तेथील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. सबस्टेशनला एखाद्या शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरुन फोन केल्यास एक तर फोन उचलत नाही आणि उचलला तर तेथील चौकीदार फोन उचलतात. त्यामुळे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे, ती बरोबर मिळत नाही. या सबस्टेशनचा अतिरिक्त भार नाचणगाव येथील अभियंता तिमांडे यांच्याकडे आहे. तेसुद्धा मोबाईल उचलण्यास तयार नसतात. वीज वितरण कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीचे सीमकार्ड दिले, पण त्या सीमचा ग्राहकाला कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. तसेच कंपनीच्या नियमानुसार कार्यालयाच्या बाहेर फलकावर संपूर्ण कर्मचाऱ्याचे मोबाईल नंबर लिहण्याचे आदेश आहे. तेही आदेश धाब्यावर ठेवलेले आहे. सबस्टेशनमधील संपूर्ण कर्मचारी बाहेरगाऊन ये-जा करतात. त्यामुळे कार्यालयीन वेळेत पोहचत नाही. शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या संपूर्ण कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहण्याचा आदेश आहे. तोही आदेश धाब्यावर ठेवला आहे.
कर्मचारी राहत नसल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. येथे नियमित अधिकारी नसल्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरु आहे.(वार्ताहर)