मेक इन इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काम करावे
By Admin | Updated: March 27, 2016 02:13 IST2016-03-27T02:13:40+5:302016-03-27T02:13:40+5:30
आजचे विद्यार्थी हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे देशासाठी योजदान हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेक इन इंडिया च्या माध्यमातून काम करायचे आहे.

मेक इन इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काम करावे
रामदास तडस : यशवंत कन्या माध्यमिक शाळेत ‘नो व्हेईकल डे’ सायकल रॅलीद्वारे प्रबोधन
देवळी : आजचे विद्यार्थी हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे देशासाठी योजदान हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेक इन इंडिया च्या माध्यमातून काम करायचे आहे. असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
स्थानिक यशवंत कन्या माध्यमिक शाळेत शनिवारी सकाळी ‘नो व्हेईकल डे’ बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, मुख्याध्यापक उर्मिला मसराम, मुख्याध्यापक अनिल तडस, न.प. सभापती दिलीप कारोटकर व डॉ. श्रावण साखरकर उपस्थित होते.
लोकमत वृत्तपत्र समूहाचा उपक्रम म्हणून सर्वात प्रथम खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. रॅलीचा समारोप कन्या शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. येथील औद्योगिक वसाहतीमुळे देवळीला शहराचा दर्जा प्राप्त होत आहे. पॉवरग्रीडच्या माध्यमातून शहराचे नाव देशाच्या नकाशावर आले आहे. महालक्ष्मी सारख्या उद्योगामुळे रोजगारनिर्मिती होत आहे. पण वाढते प्रदुषण चिंतेची बाब आहे. त्यामुळे कारखानदारांनी आकाशात एका विशिष्ट उंचीवर धुरांडे लावून प्रदुषणाचे नियोजन करावे असेही खा. तडस म्हणाले. महिलांच्या पुढाकाराने समाजाची उन्नती होणार आहे. त्यामुळे स्त्रीयांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची गरज पोलीस निरीक्षक मदने यांनी व्यक्त केली. सुदृढ समाजासाठी ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम सर्वांच्या हिताचा ठरला आहे. नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तसेच परिसर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. मुख्याध्यापक उर्मिला मसराम यांनीही विचार व्यक्त केले.
संचालन पौर्णिमा साखरकर यांनी केले. आभार अर्चना बाराहाते यांनी मानले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक विजय मांडवकर, रेखा शेरजे, अनिल देशमुख, निर्मला गुल्हाणे, सुधीर राठोड, संगीता मालेकर, वसुंधरा बिरे, प्रतिमा खडगे, नीता चोरे, वंडू वैद्य, प्रा. नितीन आचार्य, प्रा. पंकज चोरे, किरण ठाकरे, गणेश शेंडे, महालक्ष्मीचे प्रकाश दुधकोहळे, अमर मुरार, देवानंद उराडे, शंकर मांजरीवार, सुषमा बाभळे, रजनी टोणपे, प्रतिभा महल्ले, सुरेखा नगराळे, अनिता कापसे, संतोष नागरे, सागर वानखेडे, वनिता बाळबुधे, आशालता डिकोले, कराटे क्लबचे शिवा गोडबोले, सोयल शेख व राजीव गांधी व कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)