जात प्रमाणपत्रासाठीची विद्यार्थ्यांची परवड थांबणार

By Admin | Updated: February 9, 2016 01:47 IST2016-02-09T01:47:34+5:302016-02-09T01:47:34+5:30

शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता जात, उत्पन्न, अधिवास व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी धावपळ होते.

Students will be given admission for the caste certificate | जात प्रमाणपत्रासाठीची विद्यार्थ्यांची परवड थांबणार

जात प्रमाणपत्रासाठीची विद्यार्थ्यांची परवड थांबणार

सुट्यांत शिबिर : शाळेतच मिळणार प्रमाणपत्र
वर्धा : शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता जात, उत्पन्न, अधिवास व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी धावपळ होते. यावर मार्ग काढत वर्धेत आता शाळेतच शिबिराचे आयोजन करून आवश्यक प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपविभागीय कार्यालयासह तहसील कार्यालयात एकाच वेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. यात काहींना आवश्यक प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत होती. यावर मार्ग काढण्याकरिता आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांची सभा विश्राम भवन येथे पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शाळेतच देण्यासाठी शिबिर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांची दरवर्षी जातीचे प्रमाणपत्र, अधिवास, उत्पन्न व अन्य कागदपत्र काढण्यासाठी त्रेधातिरपट उडत असते. शैक्षणिक सत्र सुरू होताना तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची झुंबड निर्माण होते. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचाही धोका असतो, ही बाब लक्षात घेवून विश्राम भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तहसीलदार राहुल सारंग, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनराज तेलंग यांच्यासह शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. भोयर यांनी सांगितले की विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र शाळेतच काढण्यात यावे. राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान मोहिमेंतर्गत प्रत्येक शाळेत विशिष्ट शिबिर घेण्याबाबत सूचना केल्या. त्यांच्या या सूचना अधिकारी व मुख्याध्यापकांनी मान्य केल्या.
या शिबिरात प्रमाणपत्राकरिता आवश्यक कागदपत्रे एकत्र करून संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे गोळा करून ती तयार ठेवावीत. दहावीची परीक्षा असल्याने शिबिर एप्रिल महिन्यापासून घेण्याचेही सभेत ठरले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची यादी व कागदपत्रांची यादी बनवावी. कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळ देण्यात यावा. तशी सुचना फलकावर लावण्यात यावी, अशी सूचना यावेळी देण्यात आल्या.
सभेत मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्रासंबंधी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर मार्ग काढण्याचेही आमदार म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Students will be given admission for the caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.