शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:54 IST

मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची ताटकळ : चार दिवसांपासून बस होताहेत नादुरूस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. बसच्या प्रतीक्षेत भुकेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती-हिंगणघाट ही जलद बस तासभर रोखून धरली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर पर्यायी व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.पण, तोपर्यंत परिवहन महामंडळाच्या दैनावस्थेचे वाभाडे निघाले.देवळी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने परिसरातील विद्यार्थी दररोज देवळीत शिक्षणाकरिता येतात. सकाळी शाळा सुटल्यानंतर देवळी स्थानकावरुन दुपारी १२ वाजतादरम्यान गौळ, कोळोणा व टाकळी (खोडे ) या गावातील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था आहे. परंतु ही बस मागील चार दिवसांपासून देवळी बसस्थानकावर आल्यानंतर पंक्चर होते. त्यामुळे सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजतापर्यंत उपाश्यापोटी ताटकाळत रहावे लागते. बुधवारी बस पंक्चर झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानकावरील विद्यार्थ्यांनी बसचालकाला मदत केली. गाडीचे चाक काढण्यापासून पंक्चर दुरुस्त्त करेपर्यंत सहकार्य केले. तेव्हा कुठे ती बस दोनवाजेपर्यंत दुरूस्त झाल्याने तीन-साडेतीन वाजता गावात पोहचली. पुन्हा गुरुवारलाही तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांचा संयम ढळला. त्यांनी जलद बस अडवून धरत परिवहन महामंडळाच्या निद्रिस्त प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला.नवीन टायर नसल्याने पंक्चरचे प्रमाण वाढलेपुलगाव डेपोला नवीन टायरचा पुरवठा केला नसल्याने पुर्णत: घासलेले जुने टायर वापरले जात आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसगाड्यांसाठी वापरले जाणारे टायर टाकावू स्वरूपाचे असल्याने वेळोवेळी पंक्चर होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. चालक व वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला समोरे जावे लागते.जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करादेवळी बसस्थानकावर परिवहन महामंडळाचा जबाबदार व्यक्ती नसल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याठिकाणी कार्यरत महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना सवलतीची पास देताना वेठीस धरतात. तसेच प्रवाशी व विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देतात. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर जबाबदार व समजदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळ