दक्षिण आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी घेतले भारतीय शेतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:04 IST2017-09-21T00:04:28+5:302017-09-21T00:04:57+5:30
धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली.

दक्षिण आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी घेतले भारतीय शेतीचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेत दक्षिण आफ्रिकेच्या ११ प्रशिक्षणार्थी तसेच, ब्राझील व आॅस्ट्रेलिया येथील प्रशिक्षणार्थ्यांनी भारतीय शेतीची माहिती जाणून घेतली.
सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना गेल्या ५० वर्षात भारतात झालेले शेतीतील बदल, भारतीय शेतीपुढील आवाहने, शेतीतील नवीन प्रयोग व त्या दिशेने होत असलेले प्रयत्न याबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, क्षेत्रभेटी, प्रयोगशील शेतकºयांशी संवाद आदी उपक्रमे राबविण्यात आले. कार्यशाळेत धरामित्र संस्थेचे अध्यक्ष व जैववैज्ञानिक डॉ. तारक काटे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. वेणू गोपालन, शेती अभ्यासक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विजय जावंधिया, अंकुर सीड्सचे संचालक रवी काशीकर, अभ्यासक अपर्णा पल्लवी, डॉ. उल्हास जाजू, मगनसंग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता, जीवशास्त्रज्ञ सोनाली फाटे यांनी मार्गदर्शन केले. विदेशी पाहूण्यांनी यशस्वीरित्या सेंद्रीय शेती करणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सुभाष शर्मा व वर्धा जिल्ह्यातील शेतकरी दीपक बर्डे यांच्या शेताची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच आर्वी तालुक्यातील शेतकºयांसोबतचे कार्य, गाव परिसरात उभारलेल्या परसबागा, काकडदरा येथील पाणी फाऊंडेशन पुरस्कृत वॉटर कप स्पर्धेअंतर्गत लोकसहभागातून करण्यात आलेले मृदा व जलसंधारणची कामे, सेवाग्रामजवळील दुग्ध उत्पादन व दुध संकलन, रामनगर येथील गोरस भांडार मधील दुग्ध संकलन, वितरण व विविध दुग्धजन्य खाद्य पदार्थ निर्मिती, मगन संग्रहालयातील विविध ग्रामोपयोगी उपक्रमाची माहिती या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांनी जाणून घेतली. कार्यशाळेचा समारोप माजी प्राचार्य अॅड. अशोक पावडे यांच्या उपस्थितीत झाला.