विद्यार्थिनींचा ठिय्या
By Admin | Updated: July 17, 2014 00:14 IST2014-07-17T00:14:33+5:302014-07-17T00:14:33+5:30
शाळांचे सत्र सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही तालुक्यातील विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे पासेस देण्यात आलेल्या नाहीत़ यामुळे शैक्षणिक भवितव्यच

विद्यार्थिनींचा ठिय्या
पासेसचा मुद्दा ऐरणीवर : बांधकाम विभागालाही ठोकले कुलूप
आर्वी : शाळांचे सत्र सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही तालुक्यातील विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे पासेस देण्यात आलेल्या नाहीत़ यामुळे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले़ पासेस त्वरित देण्याच्या मागणीसाठी बुधवारी विद्यर्थिनींनी उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले़ अचानक झालेल्या आंदोलनामुळे परिवहनच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली़ बसेस अडकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़
राज्य परिवहन महामंडळाद्वारे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर या योजनेंतर्गत मोफत प्रवास पासेस दिल्या जातात़ शालेय सत्र सुरू होऊन पंधरावडा उलटला; पण अद्यापही पासेस देण्यात आल्या नाहीत़ यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाताना अडचण व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जि.प. कन्या, गांधी विद्यालय, कृषक व इतर शाळांत शिक्षणासाठी येणाऱ्या तालुक्यातील सुमारे २०० विद्यार्थिनींनी बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केले़ भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता बस निघण्याच्या मार्गावरच ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने सर्वच बसेस अडकल्या होत्या़ आर्वीतील जि.प. कन्या शाळा, गांधी विद्यालय, कृषक विद्यालय तसेच तालुक्यातून अन्य शाळांत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना त्वरित पासेस देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली़ आंदोलक पदाधिकारी उग्र झाल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता़ अखेर आगार व्यवस्थापकांनी पासेस त्वरित देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दोन्ही आंदोलनांमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळा नांदुरकर, मनोज कसर, प्रशांत ठाकूर, संजय थोरात, संजय राऊत, प्रफूल काळे, राजाभाऊ गिरधर, प्रकाश गुल्हाणे, सूर्यप्रकाश भट्टड, सागर सारसर, विजय वाजपेयी, धनंजय घाटनासे, मिलिंद हिवाळे, मथुरेश पुरोहित, मनोज वर्मा, रणजीत घोडमारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला़(तालुका प्रतिनिधी)