मांस विकत घेणाऱ्याला अटक
By Admin | Updated: November 27, 2014 23:38 IST2014-11-27T23:38:38+5:302014-11-27T23:38:38+5:30
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची शिकार करून मांस विकणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून मांस विकत घेणाऱ्या एकाला गुरुवारी

मांस विकत घेणाऱ्याला अटक
हरिण शिकार प्रकरण : तिघे अद्याप फरारच; चामड्याचा शोध सुरू
आकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची शिकार करून मांस विकणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून मांस विकत घेणाऱ्या एकाला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव मंगेश डोफे असे असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक झाली असून अन्य तिघे अद्यापही फरारच आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हरणाच्या शिकार प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कैलास पुरूषोत्तम पारिसे याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या घरून दोन किलो मांस व शिकारीकरिता वापरलेले साहित्य तसेच हरणाची हत्या करण्याकरिता वापरलेले हत्यार जप्त केले आहे. शिकारीच्या वेळी त्याच्या सोबत असलेला त्याचा सहकारी सुनील पळसराम पचारे हा फरार झाला होता़ आरोपी कैलासच्या बयाणाप्रमाणे सदर हरिण अंदाजे १५ किलोचे होते व मोका पंचनाम्यात दोन किलो मांस आढळून आले़ उरलेल्या मांसाची विल्हेवाट कशी लावली़ याबाबत आरोपीने मांस विकत घेणाऱ्यांची नावे वनविभागला सांगितली असून त्यापैकी मंगेश डोफे याला गुरुवारी पहाटे ३ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी एस़डी़ खोब्रागडे यांनी त्याच्या घरून चौकशीकरिता ताब्यात घेतले.
आरोपीने जाळे लावून हरिण पकडलेली जागा, हरिणाचे कातडे नदीत ज्या ठिकाणी फेकले ती जागा दाखवली असून मुंडके व पाय कापून मांसातच मिसळविल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याने मांसातून मुंडक्याचे काही भाग सुद्धा वनअधिकाऱ्यांना दाखवले़ फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे खोब्रागडे म्हणाले़ दोनही आरोपीना वनकोठडी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)