एसटींचे विदु्रपीकरण
By Admin | Updated: January 10, 2015 22:59 IST2015-01-10T22:59:34+5:302015-01-10T22:59:34+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना जाहिरातींचे पत्रक चिकटविण्यात येतात. एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही यामुळे विदु्रपीकरण होत आहे. महामंडळाच्या बस फुकटात जाहिराती

एसटींचे विदु्रपीकरण
कारवाईचा अभाव : सौंदर्य धोक्यात
श्रेया केने - वर्धा
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना जाहिरातींचे पत्रक चिकटविण्यात येतात. एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही यामुळे विदु्रपीकरण होत आहे. महामंडळाच्या बस फुकटात जाहिराती लावण्याचे साधन ठरत असल्याचे दिसते. यावर कारवाई होत नसल्याने या जाहिरातदारांचे मात्र चांगलेच फावत बसल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे मात्र परिवहन महामंडळाला चांलाच फटका बसत आहे.
बरेचदा या जाहिरातदारांकडून बसच्या दर्शनी भागावरही पत्रक लावले जातात. उत्पादनांच्या जाहिरातीचे फलक चिकटवून महामंडळ प्रशासनाने लावलेल्या महत्त्वाच्या सूचनाही यामुळे झाकल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाकडून बसच्या दर्शनी भागात व्यावसायिक व शासकीय उत्पादनांच्या जाहिराती लावण्यात येतात. याबाबत एसटी महामंडळासोबत ठराविक कालावधीकरिता व्यावसायिक करार केला जातो. यातून एसटीला उत्पन्नही मिळते. हरविलेल्या व्यक्ती संदर्भातील सूचना तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या माहिती संदर्भातील फलक बसच्या बाह्य व अंतर्गत भागावर लावण्यात तितकेसे वावगे ठरणारे काही नाही. महामंडळ प्रशासनाकडून कारवाई गरजेची आहे.