प्रहारने राबविला ढग्यात सेवा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:42 IST2018-02-15T22:41:04+5:302018-02-15T22:42:22+5:30
प्रहार संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ढगाभुवन येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस हा उपक्रम प्रहार संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर यांनी राबविला.

प्रहारने राबविला ढग्यात सेवा प्रकल्प
ऑनलाईन लोकमत
वर्धा : प्रहार संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ढगाभुवन येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस हा उपक्रम प्रहार संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर यांनी राबविला.
यात ७५ तरूण-तरूणी सहभागी झाले होते. देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालय व सिंदी रेल्वे येथील वझूरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वन परिक्षेत्र अधिकारी ताल्हन तसेच पोलीस दलाचे जवान गृहरक्षक व परिवहन महामंडळाने या उपक्रमासाठी सहकार्य केले. मागील २४ वर्षांपासून हा उपक्रम प्रहार संस्थेचे वतीने राबविला जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वृद्ध व महिलांना चौरागडावर चढण्यास मदत करणे, शिवलींगचे दर्शन घेण्यासाठी मदत करणे, यात्रेत शिस्त टिकविणे, अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहोचविणे, यात्रेकरूंना बसेसमध्ये रांगेत चढविणे व भक्तगणांना या स्थळाविषयी माहिती सांगणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. महाशिवरात्री सेवा प्रकल्प यशस्वीतेकरिता स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, कवीता शिंदे, प्रगती मेलेकर, सपना बनसोड, राहुल कामडी, तुषार झाडे, मयूर चंदनखेडे, प्रणाली साबळे, गायत्री भोयर, पायल धोटे, पूनम बैस, वैष्णवी घोडे, पल्लवी उपासे, प्रफुल बेले, निहाल झाडे, अपूर्वा कठाणे, दर्शन डोंगरे, देवानंद चव्हाण, अविनाश वैद्य, आशिष परचाके, रवी बकाले यांच्यासह एन.सी.सी. कॅडेट्स व रोव्हर्स, रेजर्सनी सहकार्य केले.