वाळू चोरांवर कठोर कारवाई
By Admin | Updated: November 13, 2014 23:06 IST2014-11-13T23:06:37+5:302014-11-13T23:06:37+5:30
वर्धा नदीसह बोर, वना आदी नद्यांमधून वाळू काढण्यासाठी मुदत संपली आहे. असे असताना जिल्ह्यात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळूची अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई

वाळू चोरांवर कठोर कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत : घाटांवर पोलीस व महसूल विभागाचे पथक
वर्धा : वर्धा नदीसह बोर, वना आदी नद्यांमधून वाळू काढण्यासाठी मुदत संपली आहे. असे असताना जिल्ह्यात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळूची अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्यात. शिवाय या चोरांवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची मुदत संपली असतानाही नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी गंभीर दखल घेतली आहे. अवैधपणे वाळू काढणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पथक निर्माण करून गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी विलास ठाकरे, घनश्याम भुगावकर तसेच तहासीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.के.बढे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)