राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करणार

By Admin | Updated: November 24, 2014 23:01 IST2014-11-24T23:01:40+5:302014-11-24T23:01:40+5:30

राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ग्राहक संरक्षण परिषदांचेच गठण झाले नसल्याची खंत ग्राहक कल्याण सल्लागार

To strengthen the customer movement in the state | राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करणार

राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करणार

चंद्रकांत दळवी यांची माहिती : ग्राहक संरक्षण परिषदांच नाही
वर्धा : राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ग्राहक संरक्षण परिषदांचेच गठण झाले नसल्याची खंत ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत दळवी यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दळवी महाराष्ट्राच्या ४८ दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ते वर्धेत आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून ग्राहक संरक्षण परिषदांबाबतचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ही समितीच गठित झाली नसल्याची बाब निदर्शनास आली. येत्या १५ दिवसांत समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी करण्याची गरज आहे. या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्र असावा, ग्राहक संरक्षण परिषदेचे कार्य जिल्हा आणि तालुका पातळीवर असावे, या परिषदांच्या बैठका महिन्यात एकदा आणि वर्षभरात १२ वेळा व्हावी. २४ डिसेंबर हा भारतीय ग्राहक दिन आणि १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य तसेच १९८६ चा ग्राहक कायदा सर्वांना माहिती होण्यासाठी शाळा महाविद्यालयातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचावा. केंद्राप्रमाणे राज्यात व्यक्ती व संस्थेसाठी यशवंत ग्राहक राज्य पुरस्काराचे आयोजन करावे, या अन्य बाबींचा प्रस्तावात समावेश असणार आहे, असेही दळवी म्हणाले. यावेळी स्मीता नॉरकर, गिरीष भोसले उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: To strengthen the customer movement in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.