शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत ...

ठळक मुद्देवीजतारा, झाडे उन्मळूृन पडली, अनेक घरे व गोठ्यांवरील टिनपत्रेही उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत लाखोंची हानी केली. पुन्हा एकाच दिवसाच्या फरकाने आलेल्या सुसाट चक्रीवादळाने उर्वरित केळी पिकांची वाट लागली. घरावरील छत, टिनपत्रे दूरपर्यंत उडून गुले. रस्त्याच्या कडेला असलेला एक लोखंडी पानठेला २०० मीटर उडून गेला. सेलू, बेलगाव व आजूबाजूच्या काही गावांना मोठा फटका बसला. इतरही गावात वादळाने मोठे नुकसान केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्याच वादळातील तुटलेला वीजतारा खांब सुरळीत करतांना त्रेधातिरपीट उडाली तर पुन्हा वादळाने वीजतारा तुटला व खांब वाकल्याने त्यांचे हाल सुरू आहे.आंजी (मोठी) येथे विजेवरील उपकरणे निकामीआंजी (मोठी) : शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील दीपक वनवे यांच्याकडील कॅमेरा, डीव्हीआर, दूरचित्रवाणी संच, सेटटॉप बॉक्स आणि दिवे, शिव डोंगरे यांच्याकडील दूरचित्रवाणी संच निकामी झाले. तर निखिल मिसाळ यांच्याकडील लाईट व पंखे जळाले. यामुळे संबंधितांचे नुकसान झाले.घोराडात वादळवारा, गारपीटघोराड : सतत येत असलेले वादळी वारे पुन्हा एकदा शनिवारी मध्यरात्री धडकल्याने शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. शनिवारी कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल शासन दप्तरी तयार होणार, तोच शनिवारी रात्री ११.४५ ला वादळीवाºयाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटाने सर्वांची झोप उडविली. एक तासाहून अधिक काळ वादळाचे थैमान सुरू होते. दरम्यान अनेकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. शेतातील गोठ्यांची पडझड झाली. केळीच्या पानांची दुर्दशा झाली. आता काही जण केळी उपटून पºहाटी लावण्याचा मार्ग शोधत आहे. सतत झालेल्या वादळवाºयामुळे वीज वितरण कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे. शेतातील कृषिपंप सुरू करायचे की, गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. वीज वितरण घोराड शाखेअंतर्गत सुकळी, कोटंबा, घोराड, मोही असा विस्तीर्ण परिसर आहे. वीज कर्मचाºयांची कमतरता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणीची ठरत आहे. वाकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याने शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वादळी वाºयासह पावसाने गावखेड्यातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊस