शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी (लहान) येथे वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देअनेक घरांवरील छप्पर उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. गावातील अनेक घरांवरील छप्पर उडाल्याचे दिसून आले. यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले.असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी रसुलाबाद येथे घडला. यात एका युवा व्यावसायिकाच्या कुक्कुटपालन केंद्रावरील छत उडाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. तर अल्लीपूर परिसरात काल सांयकाळी आलेल्या पावसामुळेही मोठे नुकसान झाले. रसुलाबाद लगतच्या (बऱ्हा) सोनेगाव येथील नागरिकांना या वादळाचा फटका बसला. यात बरेच कुटुंब उघड्यावर आल्याने प्रहार संघटनेकडून त्यांना मदत देण्यात आली.आपतग्रस्तांना प्रहार संघटनेकडून मदतीचा हातगुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा रसुलाबादसह बाऱ्हा सोनेगाव या गावांना मोठा तडाखा बसला. या वादळामुळे येथील अनेक कुटुंब उघड्यावर आले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य व प्रहारच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा राजेश सावरकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुलगाव देवळी मतदार संघाचे प्रमुख राजेश सावरकर हे बाऱ्हा सोनेगाव येथे पोहोचले. या वादळापूर्वीही २७ मे २०१८ ला असाच प्रकार या गावांत झाला होता, त्यात प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून लगेचच आम्ही मदत देऊ असे जाहीर केले. मात्र यांची मदत मिळाली नसल्याने गावकरी दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यात एसडीओ शर्मा यांनी दोन दिवसात मदत पोहोचेल असे म्हटले होते, परंतु अजूनही त्यांना मदत मिळाली नाही. बाऱ्हा सोनेगाव हे गाव १०० टक्के कोलाम वस्तीचे आहे, त्यात चक्री वादळाने तेथील घरावरील टिन पत्रे उडून गेले, कवेलु उडून गेले, भिंती पडल्या, पोल पडले, लाईन तार तुटून पडल्या. त्यातल्या त्यात पत्रे उडून गेल्याने घरांमध्ये पाणी साचले. यात घरातील धनधान्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्या. दिवस कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यामुळे या संघटनेतर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या वादळात जखमी झालेल्या गर्भवती महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी आनंद राठी, अजय भोयर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.विजेचे खांबही कोसळलेशुक्रवारी आलेल्या या वादळात घरावरील टिनपत्रे उडून गेले. सोबतच गावाला विघुत पुरवठा करणारे खांबही कोसळले यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून रात्रभर दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. याचा त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावात जावून झालेल्या नुकसानाची पाहणी करून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही गावात सांयकाळपर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे कामाला गती देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस