वर्धा रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा द्या
By Admin | Updated: December 19, 2015 02:10 IST2015-12-19T02:10:41+5:302015-12-19T02:10:41+5:30
येथील मुख्य रेल्वे स्थानकावर असलेल्या सुविधांचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सूद आले होते.

वर्धा रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा द्या
रेल्वे महाव्यवस्थापकांची वर्धा रेल्वेस्थानकाला भेट : खासदारांनी केली प्रवाश्यांच्या असुविधांबाबत चर्चा
वर्धा : येथील मुख्य रेल्वे स्थानकावर असलेल्या सुविधांचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सूद आले होते. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे प्रवाश्यांना होत असलेल्या असुविधांची माहिती दिली. सोबतच येथून व जिल्ह्यातील विविध स्थानकावरून जाणाऱ्या सुपर फास्ट गाड्यांचा थांबा वर्धा स्थानकावर देण्याबाबत चर्चाही केली.
यावेळी खा. तडस यांनी सूद यांच्याशी केलेल्या चर्चेत वर्धा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या रखडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या सूचना केल्या. तसेच वर्धा-नागपूर या मार्गे सुरू करण्यात येत असलेल्या तिसऱ्या लाईनच्या कामाच्या स्थितीची माहिती घेतली. सेवाग्राम व वर्धा रेल्वे स्थानकावर विविध पदार्थांची विक्री करण्याकरिता असलेल्या स्टॉलच्या रखडलेल्या निविदेबाबत खासदार तडस यांनी विचारणा केली. सोबतच सिंदी (रेल्वे) येथील उड्डाण पूल आणि सेवाग्राम येथे रॅम्प तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच पुलगाव स्थानकावर नवजीवन एक्स्प्रेसचा थांबा देण्यात यावा, एपी एक्स्प्रेसला सेवाग्राम स्थानकावर थांबा देण्याबाबतही मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनील सुद यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)
त्रिवेणी राजभाषा प्रदर्शनाचे उद्घाटन
मध्य रेल्वे नागपूर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आणि राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा रेल्वे स्थानकावर हिंदी की ‘त्रिवेणी राजभाषा’ प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक एस.के. सूद यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य राजभाषा अधिकारी एस.के. कुलश्रेष्ठ, मध्य रेल्वे नागपूरचे मंडल रेल प्रबंधक ओ.पी. सिंह, हिंदी विद्यापिठाचे प्रकुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, प्रा. सुरेश शर्मा, प्रा. अनिल कुमार राय, डॉ. अशोकनाथ त्रिपाठी, डॉ. हेमचंद वैद्य, रेल्वेच्या राजभाषा अधिकारी पौर्णिमा सुरडकर, डॉ. ओ. पी. गुप्ता, नरेंद्र दंढारे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.