गोपालकांवर होत असलेले अन्याय थांबवा
By Admin | Updated: January 10, 2016 02:39 IST2016-01-10T02:39:55+5:302016-01-10T02:39:55+5:30
तालुक्यात महाकाळ शिवारातील गोपालकांच्या शेतालगतच्या शिव उठवण्यास दबाव आणला जात आहे.

गोपालकांवर होत असलेले अन्याय थांबवा
बसपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : तालुक्यात महाकाळ शिवारातील गोपालकांच्या शेतालगतच्या शिव उठवण्यास दबाव आणला जात आहे. तसेच ज्ञानेश्वर सहारे या गोपालकाच्या मारेकऱ्याला अद्यापही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे गोपालकांवर होत असलेले अन्याय थांबविण्याची मागणी बसपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाकाळ येथे गोपालक बहुसंख्येने आहेत. जनावरे चारण्याकरिता त्यांना दुसऱ्या गावच्या शिवारातही जावे लागते. अशावेळी शेतमालकांकडून शिवीगाळ, मारहाण, धुऱ्यालगत विषारी पदार्थ ताकणे, गोपालकांला मारहाण करणे असे प्रकार नेहमीच घडतात. असाच प्रकार जनावरे व बकऱ्या चारत असलेल्या ज्ञानेश्वर सहारे (४५) यांच्यासोबत घडला. त्याच्या मारेकऱ्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व समस्या सोडविण्यासंदर्भात बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना शिष्टमंडळात बसपा जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, उपाध्यक्ष भास्कर राऊत विक्रम सहारे, अजाबराव भोकटे, पंजाबर भोकटे, मंगेश ढेपे, नितीन दुधकोहळे, लक्ष्मण फुलमाळी, सोपान करलुके, नत्थू लसवंते, राजू थोटे, उमेश देहारे, माधव चौधरी, अरूण राऊत, बाळू वाघाडे, मनीष फुसाटे, विपुल बौद्ध, मिलिंद शंभरकर, किशोर चौधरी आदींचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)