शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सूर अन् धाम नदीपात्रातून वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM

सूरगाव शिवारातील सूर नदी तर महाकाळ येथील धाम नदीचे पात्र वाळूचा उपसा करण्यासाठी पोखरले जात आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा करून तिच वाळू नागरिकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूमाफियांचा हा प्रकार दिवसाला व रात्रीला मनमर्जीने सुरू असताना कारवाईची जबाबदारी असलेले अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहे. परिणामी, सदर अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

ठळक मुद्देवाळू माफियांचा प्रताप : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, महाकाळ आणि सूरगाव येथे होतेय अवैध खनन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. असे असतानाही काही वाळूमाफियांकडून सध्या सेलू तालुक्यातील सूरगाव शिवारातील सूर नदी तर महाकाळ येथील धाम नदीचे पात्र वाळूचा उपसा करण्यासाठी पोखरले जात आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा करून तिच वाळू नागरिकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूमाफियांचा हा प्रकार दिवसाला व रात्रीला मनमर्जीने सुरू असताना कारवाईची जबाबदारी असलेले अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहे. परिणामी, सदर अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.सेलू तालुक्यातील सुरगाव येथील सूर नदी आणि महाकाळ येथील धाम नदी पात्रातून वाळूमाफियांकडून राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. त्यामुळे या नदीपात्रात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डेही तयार झाले आहेत. सदर दोन्ही नदीपात्राची पाहणी केल्यावर वाळूमाफियांनी पर्यावरणाचा ºहास करण्याचा विडा तर उचलला नाही ना असा प्रश्न सहज पाहणी करणाºयाला पडतो. भरदिवसा तसेच रात्रीच्या सुमारास या दोन्ही नदी पात्रातून गौण खनिजाची चोरी केली जात आहे. त्यामुळे शासनाचा मोठा महसूलही बुडत आहे. असे असताना माहिती देऊनही काही अधिकारी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. वाळू माफियांकडून क्षमतेपेक्षा जास्त वाळू जड वाहनात लादून त्याची वाहतूक केली जात आहे.विशेष म्हणजे हा प्रकार वाहतूक नियमाला बगल देणारा ठरत आहे. तर वाळू घाटांचा लिलाव होण्यापूर्वीच वाळूची रात्री व दिवसालाही मनमर्जीने चोरी केली जात असल्याने उत्खनन नियम नावालाच काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत तातडीने विशेष मोहीम हाती घेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.राष्ट्रीय संपत्तीची चोरी होताना महसूलसह पोलीस विभाग गप्प?नदी, नाले, डोंगर, नदी पात्रातील गौणखनिज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे नुकसान करणाºयावर तसेच गौणखनिजाची चोरी करणाºयांवर कठोर कारवाई करण्यासाठी नियमावली आहे. परंतु, सदर नियमावलीची अंमलबजावणी करणारे धाम आणि सूर नदीतून राष्ट्रीय संपत्तीची चोरी होतानाही गप्प असल्याने कारवाई करणाºयांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहे. परिणामी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.दहा ते बारा ट्रॅक्टरने होते वाळूची वाहतूकमहाकाळ येथील धाम तर सूरगाव येथील सूर नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून दिवसभºयात दहा ते बारा ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक केली जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. असे असतानाही तालुका प्रशासनातील अधिकाºयांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांकडून दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे.दुरून ठेवली जाते पाळतनदीपात्रातून वाळूचा उपसा करताना वाळूमाफियांपैकी एका व्यक्तीकडून कुठला अधिकारी येत तर नाही ना यासाठी पहरेदारी केली जाते. कुणी येताना दिसताच तो त्याच्याजवळील भ्रमणध्वनीने इतरांना सतर्क करतो. त्यानंतर अधिकारी येण्यापूर्वीच वाळूमाफियांचे टोळके नदीपात्रातून यशस्वी पळ काढत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई करणाºयांनीही वाळूमाफियांपेक्षा एक पाऊल पुढे राहूनच कारवाई करण्याची गरज आहे.शासकीय बांधकामात चोरीच्या वाळूच्या वापराची चर्चारेहकी, कामठी तसेच परिसरात काही ठिकाणी शासकीय निधीतून विविध विकास कामे केली जात आहेत. त्याचा कंत्राट कंत्राटदाराला देण्यात आला आहे. वाळूची साठेबाजी आणि वाळूचा उपसा करण्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करून त्याची साठेबाजी सध्या केली जात आहे. इतकेच नव्हे तर सुरू असलेल्या काही शासकीय कामात चोरीच्या वाळूचा वापर होत असल्याचे बोलले जात असल्याने चौकशीची गरज आहे.‘तो’ राजकीय पुढारी कोण?एक राजकीय पुढारी त्याच्याकडे असलेल्या शेती वापराच्या ट्रॅक्टरने चोरीच्या वाळूची वाहतूक करीत असल्याची चर्चा सुरगाव परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. परंतु, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. शेतीच्या कामासाठीच्या ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक करणे कायद्यान्वये गुन्हा असून यापूर्वी एका ट्रॅक्टरचा परवानाच उपप्रादेशिक परिवहन विभागाने निलंबीत केला होता. अशीच काही धडाकेबाज कारवाई पुन्हा करून वाळूमाफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींची आहे.बंदुकधारी पोलिसासाठी अडलय घोडंवाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाºयांवर प्राणघातक हल्ले करण्यात आल्याच्या अनेक घटना आहेत. याच घटना टाळता याव्या, शिवाय कारवाई करणाºया अधिकाºयांना स्वत:चे रक्षण करता यावे या हेतूने राजपत्रित अधिकाºयांनी शासनाला वाळूमाफियांवर कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या चमूत काही बंदूकधारी पोलीस अधिकारी देण्याची मागणी केली आहे. तसेच निवेदनही संबंधितांना पाठविण्यात आले आहे. परंतु, ही मागणी अद्यापही पूर्णत्त्वास गेलेले नाही. जोपर्यंत मागणीवर विचार होत नाही तोपर्यंत वाळूमाफियांवर कारवाई करणार नाही असा पवित्रा सदर मागणी करणाºयांनी घेतला असल्याने सध्या वाळूमाफियांची चांदीच होत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. 

टॅग्स :Thiefचोर