शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे वाळू धोरण जाहीर; खरच स्वस्तात मिळतेय का वाळू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:58 IST

डेपो पद्धतीला स्थगिती : अनेकांचे रेतीआभावी बांधकाम थांबले, अवैध वाळू उपशाला लगाम कोण लावणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने वाळू धोरण जाहीर केले आहे. यामुळे योग्य दारात वाळू उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिकांत बाळगली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळू उपलब्ध झाल्यानंतर वाळू स्वस्तात मिळणार की महागडी, ही बाब स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यात वर्धा नदी व अन्य नद्या आहेत. या नद्यांवरून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात आहे. अनेक तस्करीही जिल्हाभर सक्रीय आहेत. मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारी वाळू गत काही वर्षात लवकर मिळण्यास अडचणी येत आहेत. वाळूच्या तस्करीमध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाही आर्थिक झळ बसत आहे.

शासनाने वाळू डेपोचे धोरण दोन वर्षात अंमलात आणले. मात्र, तरीही वाळूची तस्करी थांबली नाही. तस्कारांनी पुन्हा वाळूची लूट सुरू केली आहे. यावर्षी वाळूघांटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करताना ८ डेपो सुरू झाले होते. मात्र, यापैकी २ डेपो रद्द करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात ६ डेपो सुरू करण्यात आले होते. परंतु तिथून सुद्धा नागरिकांना स्वस्त वाळू मिळण्यास सुरुवात झाली नव्हती.

नवीन धोरणाची अंमलबजावणी केव्हा?नव्या वाळू धोरणानुसार वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही प्रक्रिया केव्हा राबविणार, असा प्रश्न आहे. अनेक घाटांवरून सध्या सर्रास वाळू उपसा केला जात आहे.

घरकुलांसाठी मोफत वाळूशासनाने नव्याने धोरण आखताना घरकुल योजनेवर फोकस ठेवला आहे. प्रत्येक घाटावर घरकूल कामासाठी वाळू आरक्षित ठेवण्यात येणार आहे. शिवाय, घरकूल कामसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

१० % वाळू मिळणाररेती घाटावरून १० टक्के वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत देण्याकरिता आरक्षित ठेवली जाणार आहे. ही वाळू खरोखरच लाभार्थ्यांना मिळेल काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.

घाटांच्या लिलाव प्रक्रियेनंतर ठरणार वाळूचा भाववाळूघाट लिलावासंबंधी धोरण नसल्यामुळे प्रंचड तस्करी सुरू आहे. तस्कारांकडून वाळू अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक घर बांधताना आर्थिक अडचणी येत आहेत. अनेकदा वाळूच उपलब्ध होत नसल्यामुळे बांधकामही अर्धवट राहत आहे. आत नव्या धोरणानुसार लिलाव प्रक्रियानंतर वाळूचे प्रतिब्रास भाव ठरवून दिले जाणार आहे.

धोरण तीन वर्षांकरिताराज्य शासनाने ८ एप्रिलपासून नवीन वाळू धोरण लागू केले आहे. डेपो पद्धत बंद करून प्रत्येक रेतीघाटाचा दोन वर्षासाठी लिलाव केला जाणार आहे. खाडी पात्रासाठी तीन वर्षांकरिता लिलाव राहणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाsandवाळू