शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भर चौकात पीडितेला उभे करून नोंदविले बयाण; महिला पोलिसांची निष्ठूरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:16 IST

Wardha News police विनयभंग प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलिसांनी पीडितेला भर चौकात उभे ठेवत तिच्यासमक्ष काही व्यक्तींची साक्ष नोंदविली. या घटनेमुळे झडशी परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देझडशी येथील विनयभंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यांतील पीडितेची ओळख उघड होईल तसेच तिची समाजात बदनामी होईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, न्यायालयाच्या निर्देशांकडे खुद्द महिला पोलिसांनीच पाठ दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सेलू तालुक्यातील झडशी गावात उघडकीस आला आहे. विनयभंग प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलिसांनी पीडितेला भर चौकात उभे ठेवत तिच्यासमक्ष काही व्यक्तींची साक्ष नोंदविली. या घटनेमुळे झडशी परिसरात खळबळ उडाली आहे.झडशीनजीकच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना एका मुलाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने 'तू माझ्यावर प्रेम कर, नाही तर मी माझ्या हातावर चिरे मारेल' अशी धमकी दिली. या प्रकरणी सेलू पोलिसांत विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटून आला आहे. असे असले तरी, शुक्रवारी याच गुन्ह्याच्या तपासासाठी मुख्यालय असलेल्या वर्धा येथून दोन महिला अधिकारी झडशी येथे पोहोचल्या. त्यांनी पीडितेची बदनामी होईल असे कृत्य करीत तिला रस्त्यावर उभे ठेवून तिचे व काही साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यावेळी या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत एक पुरुष कर्मचारी उपस्थित होता. पीडित मुलगी व तिची आई पोलिसांच्या गाडीमागे धावत असल्याचे विदारक चित्र येथे दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नागपंचमीनिमित्त येथील प्राचीन नागमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी. या सर्व व्यक्तींनी उघड्या डोळ्यांनी हा गंभीर प्रकार पाहिला.आज काही कर्मचारी पंचनामा व बयाण नोंदविण्यासाठी झडशी येथे गेले होते. जर असा प्रकार घडला असेल, तर ते नक्कीच चुकीचे आहे. या प्रकाराबाबतची चौकशी करण्यात येईल.- पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस