शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वृक्षतोड थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन, आमचा विरोध विनाशाला, विकासाला नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 5:59 PM

मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.

वर्धा - सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी ७० मोठ्या वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी सुमारे १०० वृक्ष तोडले जाणार आहेत. हे वृक्ष वाचविण्यासाठी सदर रस्ता चौपदरी न करता दोन्ही बाजूने थोडा लहान करावा, अशी मागणी करणारे निवेदन वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग असणाऱ्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना देण्यात आले. सध्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे रस्ता रुंदीकरण होणाऱ्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणे सुरू आहे. गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम या सुमारे चार किलोमीटर मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. हा रस्ता चौपदरी झाल्यास स्वाभाविकच वाहनांचा वेग वाढेल आणि अपघातांचे प्रमाणही वाढेल. आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात आणणारा चौपदरी रस्ता आम्हाला नको. उलट दोन किंवा तीन पदरी रस्ता करून दुतर्फा असलेले वृक्ष वाचवावेत, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनावर या परिसरातील हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र हा विकास पर्यावरणाला हानी पोहचविणारा नसावा तर गांधी जिल्ह्याच्या शांतिप्रियतेचा आणि साधेपणाचा गौरव वाढविणारा असावा, अशी भूमिका या समितीने घेतली आहे. ज्या भागातील झाडे आधीच तोडल्या गेली आहेत तेथे नियमानुसार त्वरीत वृक्षारोपण करावे, मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना सदर निवेदन देताना सुषमा शर्मा, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. आलोक बंग यांनी वृक्ष बचाओ नागरी समितीची बाजू मांडली. यात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, डाॅ. सचिन पावडे, युवराज गटकळ, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. आरती गगने व समिती सदस्य उपस्थित होते._____________

स्वातंत्र्यदिनी तरुणाईचे वृक्ष वाचवा आंदोलनएकीकडे वृक्ष वाचवून वर्धा सेवाग्राम हा मार्ग 'शांतिपथ' व्हावा, अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, गांधीविचारक मांडत आहेत. तर दुस-या बाजूने या वृक्षतोडीचा तसेच अनावश्यक रस्ता रुंदीकरणाचा विरोध म्हणून तरुणाईही आता रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान तोडलेल्या तसेच कटाईकरिता चिन्हांकित केलेल्या वृक्षांजवळ फलक घेऊन उभे रहात युवकयुवती वृक्षकटाईला आपला विरोध दर्शविणार आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच विविध सामाजिक, निसर्गप्रेमी व युवा संघटनांही सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, शूचि सिन्हा, डाॅ. अनुपमा गुप्ता, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे, डाॅ. मृत्युंजय, शिशीर देशमुख, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, राहुल तेलरांधे, मोहित सहारे, दर्शन दुधाने, गुरुराज राऊत आदींनी केले आहे._____________

मानवी वस्तीतून जाणारे चौपदरी रस्तेच अपघातांना कारणीभूत ठरतात, याबाबत अनेक तज्ज्ञांनी मांडणी केली आहे. गरज नसतानाही विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर रस्ते रुंदीकरणाचा आग्रह का धरला जातो, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गांधी फाॅर टुमारो ही संकल्पना रस्ते अतिभव्य केल्याने नव्हे तर संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न केल्यानेच पूर्णत्वाला जाईल.