वर्धा कला महोत्सवाला प्रारंभ
By Admin | Updated: November 6, 2014 22:59 IST2014-11-06T22:59:41+5:302014-11-06T22:59:41+5:30
श्री दादाजी धुनिवाले देवस्थान व दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने दादाजी धुनिवाले ऊर्फ मंगलदास बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारपासून वर्धा कलामहोत्सवाला भागवत

वर्धा कला महोत्सवाला प्रारंभ
२९ नोव्हेंपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी
वर्धा : श्री दादाजी धुनिवाले देवस्थान व दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने दादाजी धुनिवाले ऊर्फ मंगलदास बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारपासून वर्धा कलामहोत्सवाला भागवत सप्ताहाने प्रारंभ झाला आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी वर्धेकरांना मिळणार आहेत.
१० नोव्हेंबरला गझल गायक भिमराव पांचाळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ११ ते १६ नोव्हेंबरपर्यंत दररोज पहाटे ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता नि:शुल्क आरोग्य व दंत तपासणी, सोयीएसिस व त्वचारोग तपासणी शिबिर होईल. दि. १५ रोजी दुपारी ४ वाजता किल्ले बांधणी प्रशिक्षण शिबिर, दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान तपासणी शिबिर होईल. याचदिवशी तत्पूर्वी सकाळी ९ वाजता रोजी विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा होईल. दि. १८ दुपारी १२ वाजता विदर्भस्तरीय समूह नृत्य स्पर्धा होईल. दि. १९ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत रांगोळी स्पर्धा होईल. दि. २० रोजी सकाळी ८ वाजता विदर्भस्तरीय एकल बाल नृत्य स्पर्धा, २२ ला दुपारी १२ वाजता विदर्भस्तरीय फॅशन ‘शो’चे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे फॅशन शोचे आॅडिशन होणार आहे. २३ ला चित्रकला स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ नोव्हेंबरला विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. फॅशन शोचे स्थळ सावंगी(मेघे) येथील दत्ता मेघे सभागृह असून उर्वरित सर्व स्पर्धा दादाजी धुनिवाले मठ येथे होणार आहे, अशी माहिती वर्धा कला महोत्सव समितीचे सुनील बुरांडे यांनी गुरुवारी दादाजी धुनिवाले मठे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. पंकज भोयर, उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, अशोक झाडे व सदस्य उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)