उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू

By Admin | Updated: February 16, 2015 01:38 IST2015-02-16T01:38:03+5:302015-02-16T01:38:03+5:30

परिसरात कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते़ सध्या कांदा कापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे़

Start of summer onion plantation | उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू

उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू

तळेगाव (श्या़पं़) : परिसरात कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते़ सध्या कांदा कापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे़
कांदा पिकांसाठी प्रथम बियाण्यांपासून रोपे तयार करावी लागतात़ एक एकर कांदा लागवडीकरिता किमान ८ ते १० किलो कांद्याचे बी लागते़ या बियाण्याची आजची किंमत २००० रूपये प्रतिकिलोने वीस हजार रूपये होते़ बियाण्यापासून रोपे तयार होईस्तोवर खते, कीटकनाशक, फवारे व मशागतींचा खर्च २५ हजार रूपयांपर्यंत येतो. नंतर रोपाची पुन्हा लागवड केली जाते़
रोपांच्या लागवडीपासून कांदा पीक घरी येईपर्यंतचा खर्च ४० हजार रूपयांपर्यंत येतो़ म्हणजेच एक एकर कांदा लागवडीला पूर्ण ५० हजार रूपये खर्च येतो़ कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली नाही तर एका एकारामध्ये चांगल्यापैकी १५० क्विंटल कांदा उत्पादन होऊ शकतो़
अवकाळी पावसामुळे पिके जमिनदोस्त होतात तर कधी दव रोगामुळे पिके करपून हातात. कधी मध्येच ओलिताकरिता पाणी कमी पडल्याने पिके जळतात़ यामधून जर पिके वाचलित आणि चांगले भरपूर उत्पादन झाले तर पिकाला योग्य भाव मिळतो़
कधी कधी १०० ते १५० रूपये क्विंटल या अत्यल्प दराने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो़ परंतु नुकसानीचा धोका पत्करून तलेगाव परिसरातील शेतकरी कांदा व्यवसाय करीत आहेत. कांदा पिकाच्या भरवशयावरच शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या मशागती होतात. रब्बी हंगामात पेरण्यात येणारे कांद्याचे पीक हे उन्हाळ्याच्या दिवसात निघत असल्याने पावसाळ्यातील खरीप खरीप हंगाम याच पिकाच्या भरवश्यावर अवलंबून असतो़ या काही काळात तळेगाव(श्या.प.) या परिसरात कांदा उत्पादकांची संख्या वाढली आहे. कापूस व सोयाबीनला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)

Web Title: Start of summer onion plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.