एमपीएससीअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST2021-07-15T05:00:00+5:302021-07-15T05:00:23+5:30
वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागा एमपीएससीच्या मार्फत भरण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला तसेच अभ्यासिकांना परवानगी देण्यात यावी.

एमपीएससीअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एमपीएससीअंतर्गत भरती प्रक्रिया घेण्यात यावी, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्राेश आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रा. नीतेश कराळे, युवा परिवर्तन की आवाजचे संंस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी केले. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागा एमपीएससीच्या मार्फत भरण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला तसेच अभ्यासिकांना परवानगी देण्यात यावी. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना एक कोटींंची शासकीय मदत देण्यात यावी. एमपीएससीचे सदस्य पूर्ण क्षमतेने भरण्यात यावे. महापरीक्षा तसेच महाआईटी पोर्टल रद्द करण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यावेळी शासनाचा निषेध केला.