धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ
By Admin | Updated: January 14, 2015 23:14 IST2015-01-14T23:14:07+5:302015-01-14T23:14:07+5:30
ग्रा. पं.च्यावतीने बुधवारी राबविलेल्या धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्रम परिसरात असलेला संपूर्ण कचरा व नदीपात्रातील गाळ यावेळी साफ

धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ
पवनार : ग्रा. पं.च्यावतीने बुधवारी राबविलेल्या धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्रम परिसरात असलेला संपूर्ण कचरा व नदीपात्रातील गाळ यावेळी साफ करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार उपस्थित होते.
दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने जेसीबी व टिप्परची व्यवस्था करण्यात आली होती. जेसीबीने नदीपात्रातील गाळ काढण्यात आला. धाम नदीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मूर्ती व निर्माल्याचे विर्सजन केले जात आहे. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाला होता. यामुळे नदीचे पात्रही अरूंद झाले आहे. ऐतिहासिक आश्रम परिसर स्वच्छ असावा ही कल्पना येथील ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांच्या मनात आल्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता अभियानात आम्ही वर्धेकर, एच.पी. सीब्बल, गॅस एजन्सी, दुर्गा मंडळ व गावातील पुरूष व महिला मंडळांनी सहभाग घेतला. जवळपास ३०० च्या संख्येने जमा झालेल्या स्त्री-पुरूषांनी झाडू व खराटे घेऊन परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे सरपंच अजय गांडोळे व उपसरपंच जगदीश पेटकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)