स्वच्छतेच्या कार्याला स्वत:पासून सुरूवात करा

By Admin | Updated: December 27, 2015 02:35 IST2015-12-27T02:35:58+5:302015-12-27T02:35:58+5:30

स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे. देशात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Start the cleanliness process yourself | स्वच्छतेच्या कार्याला स्वत:पासून सुरूवात करा

स्वच्छतेच्या कार्याला स्वत:पासून सुरूवात करा

जयवंत मठकर : स्वच्छता संदेश व शेतकरी जागर कार्यक्रमाचा समारोप
सेवाग्राम : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे. देशात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१४ च्या गांधी जयंती दिनापासून स्वच्छ सुंदर व स्वस्थ भारताचा नारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. स्वच्छतेचे कार्य स्वत:पासून सुरू केल्यास स्वच्छतेचा प्रश्न लवकरच निकाली निघेल. संत गाडगेबाबाच्या कार्याला सर्वांची मदत व सहकार्य असणे आवश्यक असल्याचे मत जयवंत मठकर यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम आश्रमात शेडगाव ऋणमोचन ते सेवाग्राम संत ते महात्मा तका अश्या स्वच्छता संदेश व शेतकरी जागर यात्रेचा समारोप कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, यात्रा मार्गदर्शक राजू निवल, प्रकल्प संचालक रमेश राऊत, विनोद आरेवार, डॉ. सतीश खडसे, अटल पांडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी निवल म्हणाले, परदेशातील स्वच्छतेचे गोडवे गाणारे जेव्हा आपल्याच देशात कचरा करतात तेव्हा मात्र कृतीशिल आणि स्वत:पासूनच याची सुरूवात असावी असे वाटते. परदेशात कडक दंडात्मक कारवाई असते. पण आपल्या देशात तसे होत नाही. त्यामुळे स्वत: अआपली जबाबदारी ओळखणे सर्वांनी शिकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
निवल म्हणाले, शेतकरी मुळातच हुशार कष्ट करणारा असून तो अन्नदाता आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास तो आनंदाने जीवन व्यापू शकतो. इतरांप्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. लोकांना व नव्या पिढीना संत, महात्मा व स्वच्छ, सुंदर, स्वस्थ भारताबरोबरच शेतकरी समजावा आणि त्यांनी कृतिशील बनावे हाच यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले.
एक दिन मेरे सामने खडे थे बापू ही कविता डॉ खडसे यांनी सादर करून कार्यक्रमाचे संचालन केले. राष्ट्रवंदनेने या समारोपाची सांगता झाली.(वार्ताहर)

Web Title: Start the cleanliness process yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.