सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रारंभ

By Admin | Updated: May 23, 2016 02:12 IST2016-05-23T02:12:12+5:302016-05-23T02:12:12+5:30

मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती.

Start cement mortar | सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रारंभ

सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रारंभ

वृत्ताची दखल : कृषी विभागाला आली जाग
आकोली : मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत बंधारा खोलीकरणास प्रारंभ झाला.
मदनी गावाजवळून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर हा बंधारा बांधला आहे. खालच्या बाजूला म्हणजे अगदी बंधाऱ्यापर्यंत मदन उन्नई धरणाच्या पाण्याची थोप असते. वरच्या बाजूला मदना धरण आणि आंजी (बोरखेडी) तलाव आहे. वाघाडी नदीने पावसाळ्यात वरील दोन्ही धरणाचे अतिरिक्त पाणी येते आणि पूढे मदन धरणाची थोप यामुळे बंधाऱ्यात पाणी तंबते. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतपिकांची नासाडी होते. गतवर्षी बारा शेतकऱ्यांना याचा फटका बसला. उथळ बंधाऱ्यामुळे शेताचे बांध फुटून शेती जलमय झाली होती. यामुळे मागील हंगामात शेतकरी गारद झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे खोलीकरण करावे, अशी मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दीड मीटर खोल व ३०० मीटर लांबीच्या खोलीकरणास प्रारंभ करण्यात आला. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होणार असल्याने बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)

Web Title: Start cement mortar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.