सेवाग्राम आश्रमात विद्यार्थ्यांची आनंद जत्रा सुरू
By Admin | Updated: October 9, 2016 00:35 IST2016-10-09T00:35:55+5:302016-10-09T00:35:55+5:30
येथील आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन विद्यालयाच्यावतीने दोन दिवसीय आनंद जत्रेचे आयोजन केले आहे.

सेवाग्राम आश्रमात विद्यार्थ्यांची आनंद जत्रा सुरू
आनंद निकेतनचा उपक्रम : विद्यार्थ्यांनी मांडल्या कलात्मक वस्तू
सेवाग्राम : येथील आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन विद्यालयाच्यावतीने दोन दिवसीय आनंद जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. आनंद जत्रेत विद्यार्थ्यांनी खेळ, विज्ञान, कला आणि आरोग्य या विषयांवर प्रदर्शनीसह विक्री आणि प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले आहे. यातून त्यांनी आम्ही सुद्धा पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारिक कलात्मक आणि संशोधान वृत्ती बाळगतो हे दाखूवन दिले आहे.
जत्रेत बाजारमध्ये मुलांनी तयार केलेल्या अनेक सुबक व सुंदर हस्तकलेच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य जत्रामध्ये ज्ञानवर्धक, निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची माहिती तक्ता व पदार्थातून देण्यात येत होती. अन्नातील भेसळ, वैज्ञानिक प्रयोग, फु फ्फुसांची क्षमता यावर माहितीही यात देण्यात येत आहे. यात विज्ञान खेळणी, कागदी टोप्या, मातीची भांडी बनविणे, वैज्ञानिक तत्वांचा विचार करायला प्रवृत्त करणारे अनेक गंमत खेळाचा समावेश आहे. पालकांसह आश्रमात येणाऱ्या पर्यटकांचीही येथे गर्दी झाली होती. विद्यार्थी माहिती देताना हरखून जात असल्याचे दिसून आले. वस्तूंची विक्री आणि हिशोब विद्यार्थी स्वत: करताना दिसत होते. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे हे या जत्रेवरून आणि यात सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संचालिकांच्या कार्यावरून स्पष्ट दिसून आले.(वार्ताहर)
जत्रेचे स्वरूप दिले असले तरी यातून स्वनिर्मिती वस्तूंची मांडणी व विक्री विद्यार्थी स्वत: करीत आहे. दैनंदिन जीवनातील लहान सहान बाबींचा समावेश यात असल्याने शिकण्याचा आणि शैक्षणिक भाग म्हणून याचा समावेश यात आहे.
- सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम.