रखडलेल्या विहिरी मार्गी लागणार
By Admin | Updated: June 18, 2014 00:20 IST2014-06-18T00:20:42+5:302014-06-18T00:20:42+5:30
महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या जवाहर विहिरी व धडक सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या तालुक्यातील ६६ विहिरींच्या अपूर्ण बांधकामाला वाढीव

रखडलेल्या विहिरी मार्गी लागणार
हिंगणघाट : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या जवाहर विहिरी व धडक सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या तालुक्यातील ६६ विहिरींच्या अपूर्ण बांधकामाला वाढीव निधी देवून कामे पूर्णत्वास येणार असल्याची माहिती माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंगणघाट तालुक्यात सन २००७-०८ आणि ०८-०९ या दोन वर्षात एक हजार लाभार्थ्यांची जवाहर व धडक सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. यावेळी या विहिरींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येत असताना जवळपास ९०० विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास आले. परंतु ६६ विहिरीचे बांधकामाला अंशत: अनुदान देण्यात आल्याने त्या विहिरींचे काम पूर्ण झाले नाही. या विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाच्य १६ एप्रिल २०१४ च्या परिपत्रकानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता ही जवाहर विहीर व धडक सिंचन विहीर योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी ज्या ज्या अभियंत्याकडून विहिरीच्या कामाचे मोजमाप केले त्यांच्याकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे. तर जवाहर विहिरीची सुधारित प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी व धडक सिंचन विहीरीची प्रशासकीय मान्यता तहसीलदारांकडून लाभार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.
आता या योजनेंतर्गत विहिरीच्या बांधकामाचे अडीच लाखांपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची तिमांडे यांनी सांगितले. या अपूर्ण विहिरी असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत कांता साळवे, सुबा कांबळे, शंकर दांडेकर(लहान आर्वी), दिगांबर बुराडे, अन्नपूर्णा वाकडे धानोरा, रामचंद शिंदे, बापूराव महाजन, जगदीश दिवे वडनेर, गणपत शिंदे, मंजुळा मडावी सेलू(खे.), महादेव कोडापे, योगेश्वर देवळकर, विश्वनाथ सराटे ढिवरी(पिं.), रुखमाबाई पारधी गंगापूर, संतोष चांदोरे भिवापूर, विनोद बुरबुरे, राजेंद्र अवचट, महादेव कासार काचनगाव, बेबी लोहकरे फुकटा, रामकृष्ण चरडे पिपरी, जगन नगराळे, शंकर नौकरकार, वामन हिवसे, येरणगाव, शिवराम सातकर आजनसरा, खुशाल शिवणकर, चिंचोली कापसी, पावर्ताबाई मेश्राम, काजी अल्ला कदीरउद्दीन, पुंडलिक तळवेकर, शामराव डहाळकर गांगापूर कापसी, दीपक कोवे, काशीनाथ वामद कोसुर्ला, रायभान कांबळे, नारायण निशानकर, शंकर शेडमाके बाबापूर, रामचंद्र मोहोड कुटकी, त्र्यबंक भुजाडे कुटकर, हुमानंद पाटील सावली, शिवराम मेश्राम बालधुर, पुष्पा सिडाम नांदगाव(का.), मारोती झिलपीले मोझरी, गंगाराम पंधरे येरला, प्रभाकर टापरे डोरला, शंकर टेकाम बोपापूर, वेणूबाई वाघमारे इंझाळा, हरीदास कांबळे, सुनंदा सारवरकर अल्लीपूर, संजय बुटले मुरपाड, विष्णू डोंगरे चिकमोह, खुशाल भोयर चिचघाट, केशव कोहळे सावंगी (हेटी), विजय खुरसंगे गाडेगाव, रामदास नगराळे, वाघोळी,पंजाब गव्हाळकर टेंभा, वामन खोंड दोंदुडा, जनाबाई मेश्राम घाटसावली, गणेश एकोणकर, परमेश्वर खुरपाडे शेगाव(कुंड) नथ्थु लांडगे सातेपुळ, जयराम फुळकर, प्रभाकर हरणे कडाजना, भिमाबाई ठाकरे, सतीका पानतावणे, पांडुरंग किन्नाके येनोरा यांचा समावेश आहे. यावेळी पं. स. सभापती अर्चना तिमांडे, उपसभापती वंदना फटींग, जि. प.सदस्य प्रेमीला करपाते, माजी प.स. सभापती संजय तपासे, पं.स. सदस्य कांताबाई वाघमारे, नामदेवराव तळवेकर, संजय फरताडे, ओंकार मानकर, बुरबुरे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)