श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव आज

By Admin | Updated: April 19, 2016 05:51 IST2016-04-19T05:51:36+5:302016-04-19T05:51:36+5:30

भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकाळी जैन समजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त

Sri Bhagwan Mahavir Birth Kalyanak Mahotsav Today | श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव आज

श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव आज

वर्धा : भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकाळी जैन समजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अहिंसेचे प्रणेते २४ वे जैन तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता रामनगर येथील दिगंबर जैन मंदिर येथे जन्मकल्याणक महोत्सव व तीर्थंकरांच्या अभिषेकाने होईल. सराफा लाईन येथील जैन मंदिरात सकाळी ६.३० वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. तसेच जैन श्वेतांबर चंद्रप्रभू मंदिर येथे भक्तांबर पाठ, जैन स्थानक भवन येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.
महावीर जयंतीनिमित्त जैन सेवा मंडळातर्फे सकाळी ७.३० वाजता रुग्णांना फळवितरण कार्यक्रम आयोजित आहे. सायंकाळी ‘वीर से महावीर तक’ ही नाटीका आयोजित करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

रामनगर येथून
भव्य शोभायात्रा
४भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. रामनगर येथील महावीर दिगंबर जैन मंदिरातून शोभा यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा अनेकांत स्वाध्याय मंदिरात विसर्जित होईल.
४भगवान महावीर उद्यानात सकाळी १० वाजता कीर्ती स्तंभाचे पूजन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. सकाळी ११ वाजता स्वाध्याय मंदिर येथे रक्तदान शिबिर व दुपारी १२ वाजता स्रेहभोजन आयोजित करण्यात आला आहे.
४‘वीर से महावीर तक’ या हिंदी भव्य नाटिका सायंकाळी ७ वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे होणार आहे. या नाटकाची संगीत व संयोजक राजेश भुसारी तर नाट्य रूपांतर व दिग्दर्शन संध्या नितीन भागवतकर यांचे आहे.

Web Title: Sri Bhagwan Mahavir Birth Kalyanak Mahotsav Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.