स्प्रिंकलर चोरीप्रकरणी दोघे गजाआड

By Admin | Updated: August 9, 2015 02:15 IST2015-08-09T02:15:27+5:302015-08-09T02:15:27+5:30

शेतातील स्प्रिंकलरचे नोझल व इतर साहित्य लंपस करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Sprinkler robbery | स्प्रिंकलर चोरीप्रकरणी दोघे गजाआड

स्प्रिंकलर चोरीप्रकरणी दोघे गजाआड

चोरीतील साहित्य जप्त : इतरही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली
सेलू : शेतातील स्प्रिंकलरचे नोझल व इतर साहित्य लंपस करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे.
झडशी परिसरातील शेत शिवारातून इलेक्ट्रीकल मोटार, स्प्रिंकलर पाईप, नोझल इत्यादी साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी सेलू पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. जयस्वाल यांच्य शेतातील इलेक्ट्रीक मोटार चोरींचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणी नितीन गोडे (२५) व वैभव तळेवकर (२६) रा. झडशी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांना संशयावरून ताब्यात घेत पोलीसी हिसका दाखविताच चोरीच्या प्रयत्नासह परिसरातील इतरही चोरीची कबुली त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सेलू पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३७९, ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई ठत्तणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल धवणे, राजेंद्र डाखोळे, वासनिक, मोहरले, गौतम व अतुल वैद्य यांनी केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Sprinkler robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.