क्रीडाक्षेत्र हे राष्ट्रीय एकतेचे माध्यम
By Admin | Updated: August 10, 2015 01:50 IST2015-08-10T01:50:39+5:302015-08-10T01:50:39+5:30
शालेय अभ्यासक्रमाला जास्त महत्व असल्यामुळे क्रीडाक्षेत्राकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे.

क्रीडाक्षेत्र हे राष्ट्रीय एकतेचे माध्यम
आॅगस्ट क्रांती दौड : प्रहार, लायन्स व जिल्हा कार्यालयाचा उपक्रम
वर्धा : शालेय अभ्यासक्रमाला जास्त महत्व असल्यामुळे क्रीडाक्षेत्राकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे टिव्ही मोबाईल व इंटरनेटमुळे मैदानांवर खेळाडू दिसत नाही. याचा विपरित परिणाम तरूणांच्या आरोग्यावर होत आहे. याच कारणाने दिवसेंदिवस राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेमाची भावना कमी होत असल्याचे दिसते. क्रीडा मैदनावरच शिस्त, ऐकता, देशाबाबत प्रेम, कर्तव्याची जाणीव यासारख्या चांगल्या गुणांची शिकवण मिळत असते. म्हणूनच क्रीडाक्षेत्र हे राष्ट्रीय एकतेचे सर्वात माध्यम आहे, असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. विनोद अदलखिया यांनी केले.
प्रहारच्या आॅगस्ट क्रांती दिन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन ९ आॅगस्ट रोजी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी बक्षीस वितरण कआर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था, लॉयन्स क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी प्रहार आॅगस्ट क्रांती दौड पार पडली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, नागपूर विद्यापीठाच्या कॉलेज व विद्यापीठ विकास समितीचे संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, मोहन अग्रवाल, क्रीडा अधिकारी सुभाष रेवतरकर, हरिष इथापे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. वाणे, लायॅन्सचे अध्यक्ष अभिषेक बेद, लॉयनेस अध्यक्षा आस्था बेद, लियोचे अध्यक्ष नितीन घोडे, रंजना दाते, सहायक जिल्हा समिती अधिकारी शाम टरके व प्रहारे संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते.
सात कि़मी खुल्या गटातील धावस्पर्धेत राकेश मोहर्ले याने प्रथम, राकेश नेहारे द्वितीय तर राकेश करलुके याने तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या ५ कि़मी. खुल्या गटात सुनैना डोंगरे प्रेअथम, पूनम लांडगे द्वितीय तर कांचन डोंगरे हिने तिसरा क्रमांक पटकाविला. पाच कि़मी. च्या धावस्पर्धेत निखिल धोटे, धिरज होलगरे व मनीष रहांगडाले यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तीन कि़मी. मुलींच्या गटात रोशनी रामटेके, प्रिया फुलकर व वैष्णवी ठवळे यांनी प्रथम तीन पुरस्कार प्राप्त केले.
यावेळी प्रहार स्कूलच्या छात्रसैनिकांनी देशभक्ती गीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले. संचालन प्रा. रवींद्र गुजरकर व संतोष तुरक यांनी तर आभार अभिषेक बेद यांनी केले. यशस्वीतेकरिता रवी काकडे, मंगेश शेंडे, आकाश दाते, दिनेश रामगडे, रवी बकाले, संजय बारी, संजय सुकळकर, वैशाली गुजरकर, एन.सी.सी. छात्रसैनिक, प्रहारचे पदाधिकारी यांनी सहकार्यं केले.(शहर प्रतिनिधी)